पुणे। इंग्लंडचा संघ सध्या भारत दौऱ्यावर असून त्यांना कसोटी आणि वनडे मालिकेत पराभवाचा सामना करवा लागला आहे. आता भारत विरुद्ध इंग्लंड संघात वनडे मालिका सुरु होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ अहमदाबादवरुन पुण्याला पोहचला आहे.
भारत आणि इंग्लंड संघ जवळपास गेल्या महिन्याभरापासून अहमदाबादमध्ये होता. अहमदाबादमध्ये यो दोन संघात २ कसोटी आणि ५ टी२० सामने पार पडले. आता या दोन संघात २३ मार्चपासून सुरु होणारी ३ सामन्यांची वनडे मालिका पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, गहुंजे येथे होणार आहे. त्यामुळे भारतीय संघ रविवारी (२१ मार्च) चार्टर्ड फ्लाईटने पुण्याला पोहचला आहे. त्यांच्या पुण्याला पोहचल्याचा व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
Hello Pune, we're here 👋#TeamIndia #INDvENG @Paytm pic.twitter.com/JmP6EwoU3R
— BCCI (@BCCI) March 21, 2021
तसेच त्यांचे अहमदाबादवरुन पुण्याला येतानाचे काही फोटो सध्या सोशल मीडियावरही व्हायरल होत आहेत.
Rohit Sharma and team India off to Pune for the ODI series. pic.twitter.com/GAmnwo0F2c
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 21, 2021
Team India has left to Pune for the 3 Match ODI Series against England and starting from 23rd March. pic.twitter.com/CCrcdwskXB
— Tanuj Singh (@ImTanujSingh) March 21, 2021
भारतीय वनडे संघात ३ नव्या खेळाडूंचा समावेश
या वनडे मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात तीन नव्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. यात सुर्यकुमार यादव, प्रसिद्ध कृष्णा आणि हार्दिक पंड्या यांचा समावेश आहे. त्यामुळे या तिघांना वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळणार आहे. तसेच या मालिकेसाठी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे. तर मोहम्मद शमी, रविंद्र जडेजा हे खेळाडू दुखापतीतून सावरत असल्याने त्यांचाही या मालिकेसाठी भारतीय संघात समावेश नाही.
जोफ्रा आर्चर वनडे मालिकेला मुकणार
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला उजव्या हाताच्या कोपराला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो या वनडे मालिकेला मुकणार आहे. तसेच जो रुटलाही इंग्लंडने विश्रांती दिली आहे.
भारतीय संघ आत्मविश्वासाने भरलेला
भारताने या वनडे मालिकेआधी झालेली कसोटी मालिका आणि टी२० मालिका अनुक्रमे ३-१ आणि ३-२ अशा फरकाने जिंकली असल्याने भारतीय संघ आत्मविश्वासाने भरलेला आहे. तर इंग्लंड या वनडे मालिकेत विजय मिळवून दौऱ्याचा शेवट गोड करण्याचा प्रयत्न करतील.
या दिवशी होणार सामने
या वनडे मालिकेतील तीन सामने अनुक्रमे २३, २६ आणि २८ मार्च रोजी पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, गंहुंजे येथे होणार आहे. या मालिकेतील सर्व सामने भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी १.३० वाजता सुरु होतील.
इंग्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ –
वनडे मालिकेसाठी असा आहे इंग्लंडचा संघ
ओएन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जॉनी बेयरस्टो, सॅम बिलिंग्ज, जोस बटलर, सॅम करन, टॉम करन, लियाम लिव्हिंगस्टोन, मॅट पार्किन्सन, आदिल रशिद, जेसन रॉय, बेन स्टोक्स, रीस टोपली, मार्क वुड.
राखीव खेळाडू – जॅक बॉल, ख्रिस जॉर्डन, डेव्हिड मलान