मंगळवारी (दि. 12 सप्टेंबर) आशिया चषक 2023 सुपर- 4 फेरीतील चौथा सामना भारत विरुद्ध श्रीलंका संघात खेळला जाणार आहे. या सामन्याला दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी उभय संघात नाणेफेक झाली. ही नाणेफेक भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने जिंकली असून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. (India have won the toss and have opted to bat against sri lanka asia cup 2023)
भारत एक बदलासह मैदानात
भारतीय संघाने या सामन्यासाठी एक बदल केला आहे. भारतीय संघात शार्दुल ठाकूर याच्या जागी अक्षर पटेल याला संधी देण्यात आली आहे. तसेच, दुसरीकडे श्रीलंका संघात कोणताही बदल नाहीये.
सुपर- 4मधील कामगिरी
भारतीय संघाची सुपर- 4 स्पर्धेतील कामगिरी पाहिली, तर हा भारताचा दुसराच सामना आहे. यापूर्वी स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध 11 सप्टेंबर रोजी पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने तब्बल 228 धावांनी मोठा विजय साकारला. हा पाकिस्तानविरुद्ध वनडे इतिहासातील सर्वात मोठा विजय होता. आता भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध भिडणार आहे. याव्यतिरिक्त श्रीलंका संघानेही सुपर- 4मधील पहिला सामना बांगलादेशविरुद्ध खेळला असून त्यात विजय मिळवला आहे. अशाप्रकारे दोन्ही संघ विजय मिळवत सुपर- 4मध्ये एकमेकांचा सामना करणार आहेत.
सुपर-4मधील चौथ्या सामन्यासाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
India Won the Toss & elected to bat https://t.co/P0ylBAiETu #INDvSL
— BCCI (@BCCI) September 12, 2023
श्रीलंका संघ-
पथूम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), सदीरा समरविक्रमा, चरिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, दसून शनाका (कर्णधार), दुनिथ वेल्लागे, महीश थीक्षणा, कसुन रजिथा, मथीशा पथिराना
हेही वाचा-
सुपर फोरच्या चौथ्या सामन्यात Team India ‘टॉस का बॉस’, श्रीलंकेलाही देणार का धोबीपछाड?
आता आशिया चषकात Reserve Day नाही; पावसाने खोडा घातला, तर ‘हे’ दोन संघ खेळणार Final