न्यूझीलंड दौऱ्यावरील भारतीय क्रिकेट संघाचा अखेरचा सामना बुधवारी (30 नोव्हेंबर) ख्राईस्टचर्च येथे सुरू झाला. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील या अखेरच्या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी हा निर्णय सार्थ ठरवत भारतीय संघाला दबावाखाली ठेवत 219 धावांवर सर्वबाद केले. अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर याने भारतातर्फे एकाकी झुंज देत अर्धशतक झळकावले.
Washington Sundar's maiden ODI fifty has pushed India to a modest total 👏
Watch the final #NZvIND ODI live on https://t.co/CPDKNxoJ9v (in select regions) 📺
📝 Scorecard: https://t.co/1tsDRuiaj0 pic.twitter.com/IcsmB6YFDC
— ICC (@ICC) November 30, 2022
मालिकेत पिछाडीवर असलेल्या भारतीय संघाला या सामन्यात प्रथम फलंदाजीची संधी मिळाली. मात्र, न्यूझीलंडच्या गोलंदाजांच्या तिखट माऱ्यासमोर भारतीय फलंदाजांचा निभाव लागला नाही. भारताचे दोन्ही सलामीवीर शिखर धवन व शुबमन गिल अनुक्रमे 28 व 13 धावा करून माघारी परतले. या सामन्यात चौथ्या क्रमांकावर बढती देण्यात आलेला रिषभ पंत याची जादू या सामन्यातही चालली नाही. तो 16 चेंडूवर 10 धावा करत बाद झाला. सूर्यकुमार यादवही केवळ 6 धावा बनवू शकला.
चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या श्रेयस अय्यरने आपल्या फॉर्मचा फायदा घेत 59 चेंडूवर आक्रमक 49 धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर दीपक हुडा व दीपक चहर यांनी प्रत्येकी 12 धावांचे योगदान दिले. या सर्वांमध्ये पहिल्या सामन्यात आक्रमक खेळी करणाऱ्या वॉशिंग्टन सुंदर याने पुन्हा एकदा डावाची सूत्र आपल्याकडे घेतली. त्याने एकेरी दुहेरी धावा तसेच आक्रमक फटके खेळत धावफलक हलता ठेवला.
युझवेंद्र चहलने 8 व अर्शदीपने 9 धावा करून भारताला 200 पार नेण्यात योगदान दिले. वॉशिंग्टन सुंदर भारताचा अखेरचा गडी म्हणून बाद झाला. त्याने 64 चेंडूवर 51 धावांची खेळी केली. यासह भारताचा डाव 47.3 षटकात 219 धावांवर संपुष्टात आला. न्यूझीलडसाठी डॅरिल मिचेल व ऍडम मिल्ने यांनी प्रत्येकी 3 बळी मिळवले.
(India Post 219 Against Newzealand In Third ODI)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ऋतुराजच्या मनाचा मोठेपणा! म्हणाला, “माझे द्विशतक संपूर्ण महाराष्ट्राला अर्पण करतो”
‘बास करा माझी इंग्रजी इथेच संपली’, पाकिस्तानी खेळाडूकडून पत्रकार परिषदेत स्पष्ट उत्तर