fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

गेल्या ६ वर्षात टीम इंडिया भारतात ३० पैकी केवळ १ कसोटी सामन्यात झालीय पराभूत

विशाखापट्टणम। भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात पार पडलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात आज(6 ऑक्टोबर) भारताने 203 धावांनी मिळवला. या विजयाबरोबर भारताने 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.

विषेश म्हणजे भारताने मागील 6 वर्षांत मायदेशातील हा 24 वा कसोटी सामना जिंकला आहे.

भारताने 1 जानेवारी 2013 पासून मायदेशात आत्तापर्यंत 30 कसोटी सामने खेळले आहेत. या 30 सामन्यांपैकी 24 सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. तर 5 सामने अनिर्णित राहिले आहेत आणि भारताला केवळ 1 सामन्यात पराभव स्विकारावा लागला आहे.

भारताने हा एक पराभव फेब्रुवारी 2017 ला पुणे येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात स्विकारला आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून स्टिफन ओ किफने 12 विकेट्स घेतल्या होत्या. तर स्टिव्ह स्मिथने दुसऱ्या डावात महत्त्वपूर्ण 109 धावांची खेळी केली होती.

तसेच भारताने मागील 6 वर्षात मायदेशात ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, वेस्ट इंडीज, बांगलादेश आणि अफगाणिस्तान संघाबरोबर कसोटी मालिका खेळल्या आहेत. विशेष म्हणजे भारताने यातील एकाही कसोटी सामन्यात पराभव स्विकारलेला नाही.

You might also like