रोहित शर्मा आणि ईशांत शर्मा हे दोघे ऑस्ट्रेलियात होणार्या ४ सामन्यांच्या कसोटीत मालिकेतील पाहिल्या दोन सामन्यातून बाहेर पडण्याची शक्यता आहे. परंतु या दोघांना संधी मिळावी म्हणून बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाकडे मोठी मागणी केली आहे.
माध्यमांतील काही वृत्तांनुसार, बीसीसीआय ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाला म्हणाले आहे की, त्यांनी रोहित आणि ईशांत यांच्या क्वारंटाईनच्या नियमात सूट द्यावी. जेणेकरून हे दोन्ही खेळाडू भारतीय संघासाठी उपलब्ध होवू शकतील. ऑस्ट्रेलियात सध्या १४ दिवसांचा क्वारंटाईनचा कालावधी आहे. मात्र, जर ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाने बीसीसीआयची मागणी मान्य केली, तर या दोन्ही खेळाडूंना शेवटच्या दोन सामन्यात खेळता येईल.
बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाकडे केली मागणी
माध्यमातील वृत्तानुसार बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, सध्या बीसीसीआयची ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाशी चर्चा सुरू आहे. ज्यामध्ये क्वारंटाईनच्या नियमात सूट मिळण्याबाबत चर्चा सुरू आहे. जर असे झाले, तर रोहित अणि ईशांत हे दुसर्या सामन्यापासून निवडीसाठी उपलब्ध असतील. ऑस्ट्रेलियाने बीसीसीआयची मागणी अमान्य केली, तर पुन्हा रोहित आणि ईशांत यांना 14 दिवसांसाठी क्वारंटाइन व्हावे लागेल. आणि कोणत्याही सराव सामन्याशिवाय या दोघांना तिसरा कसोटी सामना खेळावा लागू शकतो.
अशी माहिती मिळत आहे की, ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळ आणि ऑस्ट्रेलिया सरकार यांच्यात चर्चा सुरू आहे. बीसीसीआय आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळ ईशांत आणि रोहित यांना सूट मिळावी म्हणून प्रयत्न करत आहेत.
आयपीएल दरम्यान ईशांत आणि रोहित यांना दुखापत
युएईत झालेल्या आयपीएलच्या तेराव्या हंगामात ईशांत शर्मा आणि रोहित शर्मा यांना दुखापत झाली होती. त्यामुळे ईशांत आयपीएलचा संपूर्ण हंगाम खेळू शकला नव्हता, तर रोहितला मुंबई इंडियन्सच्या काही सामन्यात विश्रांती दिली होती.
परंतु रोहित शर्माने अंतिम सामन्यात अर्धशतकी खेळी करून मुंबई संघाला विजेतेपद मिळवून दिले होते. आता दोघेही बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत आहेत आणि दोघांच्याही नजरा ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यावर आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
धक्कादायक ! रोहितच्या घरात कोरोनाचा शिरकाव; वडिलांना झालीय लागण ?
“मी देशासाठी काय केले हे जगाला माहीत आहे”, मलिंगा झाला भावूक
“युवा खेळाडूंमध्ये स्पार्क दिसला नाही”, धोनीच्या वक्तव्यावर ऋतुराज गायकवाडने सोडले मौन
ट्रेंडिंग लेख-
भारतीय संघातील ५ खेळाडू ज्यांनी ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटीत केली आहे दमदार कामगिरी
वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना ‘सळो की पळो’ करुन सोडणारे ३ भारतीय फलंदाज
कसोटीतील हे तीन दिग्गज कधीच दिसणार नाहीत भारताच्या निळ्या जर्सीत?