वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यातील कसोटी आणि वनडे मालिका संपली असून उभय संघात 5 सामन्यांची टी-20 मालिका सुरू आहे. टी-20 मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात वेस्ट इंडिजने भारताचा पराभव केला. मालिकेत भारताचे नेतृत्व करणाऱ्या हार्दिक पंड्या याच्यासाठीही ही कामगिरी लाजिरवाणी ठरली आहे. याच पार्श्वभूनीवर मंगळवारी (8 ऑगस्ट) वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघात महत्वाचे बदल पाहायला मिळू शकतात.
टी-20 मालिकेत वेस्ट इंडिज 2-0 ने आघाडीवर आहे. मंगळवारी (8 ऑगस्ट) होणारा तिसरा टी-20 सामना भारतीय संघासाठी महत्वाचा असणार आहे. भाारतीय संघाला या मालिकेत आपले अस्तित्व टिकवून ठेवायचे असेल तर, हा सामना जिंकावा लागणार आहे. भारतासाठी यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन (Ishan Kishan) आणि शुबमन गील (Shubman Gill) यांची सलामवीर जोडी दोन्ही सामन्यात काही खास कामगिरी करू शकली नाही. यामुळे संघात फलंदाज यशस्वी जयस्वाल याला संधी दिली जाऊ शकते.
सोबतच अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलच्या ठिकाणी दुसऱ्या खेळाडूला संधी मिळण्याची शक्यता आहे. कारण अक्षरने पहिल्या टी20 सामन्यात गोलंदाजी करत फक्त दोनच षटक टाकले होते. तर, दुसऱ्या सामन्यात तो एक फलंदाजाच्या रुपात खेळला होता. त्याने दुसऱ्या सामन्यात एकही षटक टाकले नव्हते. अशा परस्थितीत तिसऱ्या सामन्यात वेगवान गोलंदाज उमरान मलिक याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते, किंवा संघात एक अतिरिक्त फलंदाज खेळवला जावू शकतो.
तिसऱ्या टी20 सामन्यासाठी भारतीय संघाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-
ईशान किशन (यष्टीरक्षक), शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), संजू सॅमसन, अक्षर पटेल/यशस्वी जायस्वाल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, मुकेश कुमार.
तीसऱ्या टी20 सामन्यासाठी वेस्ट इंडिज संघासाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-
ब्रँडन किंग, कायल मेयर्स, जॉनसन चार्ल्स, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल (कर्णधार), जेसन होल्डर, रोमारियो शेफर्ड, अकिल हुसेन, अल्जारी जोसेफ, ओबेड मॅकॉय. (indian cricket team probable playing 11 vs west indies in 3rd t20i )
महत्वाच्या बातम्या-
भारतासाठी ‘करो या मरो’ स्थिती, पराभव स्वीकारला तर मोडीत निघणार 17 वर्षांपासूनची कामगिरी
हार्दिकची नक्की भूमिका काय? अष्टपैलू, फलंदाज की गोलंदाज? संघ व्यवस्थापनाला लागेना ताळमेळ