आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात देशाचे कर्णधार होणे सोपी गोष्ट नाही. एकतर त्या ११ खेळाडूंमध्ये निवड होणे आणि त्यातून तुम्ही कर्णधार होणे मोठी कठीण गोष्ट आहे.
अनेक खेळाडू संघातील आपली जागा पक्की करण्यासाठी चांगली कामगिरी करतात व नंतर काही वर्षांनी त्यांना ही जबाबदारी दिली जाते. Indian cricketer who captained on debut.
परंतु काही खेळाडू असेही आहेत जे आपल्या पहिल्याच सामन्यात कर्णधार झाले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये ज्या ज्या देशाने आपला पहिला सामना खेळला त्या त्या सामन्यात संघाचा निवडलेला कर्णधार हा त्याचा कसोटीतील पहिलाच सामना कर्णधार व खेळाडू म्हणून खेळला आहे.
काही खेळाडूंनी कसोटीत चांगली कामगिरी केल्यावर ते वनडेत पहिल्याच सामन्यात कर्णधार झाले आहेत. काही खेळाडूंनी थेट पहिल्याच टी२० सामन्यात संघाचे कर्णधारपद भुषविले आहे.
या लेखात क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात भारतीय संघाचे वैयक्तिक पदार्पण करताना कर्णधारपद भुषविलेल्या खेळाडूंची आपण माहिती घेणार आहोत. A cricketer who captained on debut Test, ODI or T20i.
५. सीके नायडु (भारताचे पहिले आंतरराष्ट्रीय कर्णधार, पदार्पणाच्या कसोटी सामन्यातच कर्णधार)
भारतीय संघाने आपला पहिला कसोटी सामना लाॅर्ड मैदानावर २५ ते २८ जून १९३२ रोजी खेळला. हा सामना भारतीय संघाच्या कसोटीतील पदार्पणाबरोबरच भारतीय संघातील ११ खेळाडूंच्या पदार्पणाचा सामना होता. याच सामन्यात इंग्लंडच्याही एका खेळाडूने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. या संघात ११ खेळाडूंमध्ये १६ वर्षांचा प्रथम श्रेणी क्रिकेटचा अनुभव असलेले सीके नायडु हे भारतीय संघाचे कर्णधार झाले होते. कारकिर्दीतील ७ पैकी ४ सामन्यात त्यांनी भारताचे नेतृत्त्व केले.
४. महाराजा ऑफ विझी (पदार्पणाच्या कसोटी सामन्यातच कर्णधार)
महाराजा ऑफ विझी भारताकडून २७ जून १९३६ रोजी पहिला कसोटी सामना खेळले. या सामन्यातच ते संघाचे कर्णधारही राहिले आहेत. भारताचे पहिले कर्णधार सीके नायडु देखील महाराजा ऑफ विझींच्या नेतृत्त्वाखाली तीन कसोटी सामने खेळले. महाराजा ऑफ विझी हे कारकिर्दीत केवळ ३ कसोटी सामने खेळले व या तिनही सामन्यात ते भारताचे कर्णधार राहिले आहेत. पुढे ते बीसीसीआयचे अध्यक्ष राहिले. तसेच ते लोकसभेचे खासदारही राहिले.
३. नवाब ऑफ पतौडी सिनीयर (भारताकडून पदार्पणाच्या कसोटी सामन्यातच कर्णधार)
नवाब ऑफ पतौडी सिनीयर हे देखील त्यांच्या भारताकडूनच्या पदार्पणाच्या सामन्यात कर्णधार राहिले आहेत. ते १९३२ ते १९३४ या काळात इंग्लंडकडून तीन कसोटी सामने खेळले. यात त्यांना कर्णधारपदाची संधी मिळाली नाही. परंतु त्यानंतर त्यांनी १९४६मध्ये भारताकडून इंग्लंडविरुद्ध इंग्लंडमध्ये तीन कसोटी सामने कर्णधार म्हणून खेळले.
२. अजित वाडेकर (भारताचे पहिले वनडे कर्णधार, पदार्पणाच्या वनडेतच कर्णधार)
भारतीय संघाने आपला पहिला वनडे सामना १३ जुलै १९७४ रोजी खेळला. यावेळी भारताच्या ११ तर इंग्लंडच्या एका खेळाडूने वनडे पदार्पण केले होते. सुनिल गावसकर, एकनाथ सोलकर, गुंडप्पा विश्वनाथ, ब्रिजेश पटेल, श्रीनिवास वेंकटराघवन, मदन लाल व फारुक इंजीनिअर सारखी अनेक मोठी नावे संघात होती. परंतु ८ वर्षांचा कसोटी क्रिकेटचा अनुभव असेल्या अजिक वाडेकरांच्या गळ्यात वनडे पदार्पणाच्या सामन्यातच भारताच्या पहिल्या वनडे कर्णधाराची माळ पडली. ते वनडे कारकिर्दीत केवळ २ सामने खेळले व त्या दोनही सामन्यात ते भारताचे कर्णधार राहिले.
१. विरेंद्र सेहवाग (भारताचा पहिला टी२० कर्णधार, पदार्पणाच्या टी२०तच कर्णधार)
भारतीय संघाने १ डिसेंबर २००६ रोजी पहिला टी२० सामना खेळला. यात भारताकडून ११ तर दक्षिण आफ्रिकेकडून एका खेळाडूने टी२० पदार्पण केले. भारतीय संघात तेव्हा सचिन तेंडूलकर, एमएस धोनी, हरभजन सिंग, सुरेश रैना, झहिर खान व अजित आगरकरसारखे खेळाडू असताना स्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवागच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ पडली. व तो भारताचा पहिला टी२० कर्णधार झाला. टी२० पदार्पणाच्या सामन्यातच तो कर्णधार झाला होता. परंतु हा त्याचा कर्णधार म्हणून पहिला व शेवटचा सामना ठरला.
गोष्ट एका क्रिकेटरची लेखमालेतील वाचनीय लेख-
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १९: पाकिस्तानला नेहमीच घाम फोडणारा वेंकटेश प्रसाद
–गोष्ट एका क्रिकेटची भाग १८: एकेकाळचा बाॅम्बे डक ते भारताचा प्रमुख गोलंदाज अजित अगरकर
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १७: धोनी आधी पदार्पण करुनही १४ वर्षांचा वनवास पाहिलेला दिनेश कार्तिक
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १६: राजेशाही घराण्यातूनच क्रिकेटचा वारसा घेऊन आलेला अजय जडेजा
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १५: शंभर कसोटी सामन्यांच्या उंबरठ्यावर असणारा इशांत शर्मा
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १४: भारताचा जंबो गोलंदाज अनिल कुंबळे
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १३: तब्बल १८ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा आशिष नेहरा
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १२: कारखान्यात काम करायला झाम्बियाला निघालेला मुनाफ पटेल
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ११: लांब केसांमुळे संघात प्रवेश नाकारलेला मुरली विजय
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १०: भारताचा भन्नाट क्षेत्ररक्षक मोहम्मद कैफ
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ९: म्हैसुर एक्सप्रेस जवागल श्रीनाथ
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ८: मिस्टर आयपीएल सुरेश रैना
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ७: अहमदनगरचा मराठमोळा झहीर खान
– गोष्ट एका क्रिकेटरची भाग ६: व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ५: मोठ्या भावाच्या जागी स्थान मिळालेला तो पुढे सर्वांचा दादा झाला
–एका क्रिकेटटरची गोष्ट भाग ४: ट्रक ड्राईव्हर बनण्यासाठी कॅनडाला निघालेला हरभजन सिंग
-गोष्ट एका क्रिकेटरची भाग ३: त्रिशतकाची भविष्यवाणी पदार्पणाआधीच करणारा विरेंद्र सेहवाग!
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग २: ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान संघाशी वैर घेणारा इरफान पठाण