वेस्ट इंडिजच्या विवियन रिचर्ड्सपासून ते ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह वॉपर्यंत अशा क्रिकेटविश्वातील अनेक महत्त्वपूर्ण क्रिकेटपटूंनी कित्येक वर्षे आपल्या देशाचे प्रतिनिधित्त्व केले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक क्रिकेटपटूंनी ४००पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
काही दिग्गज क्रिकेटपटूंनी तर त्यांच्या मोठ्या क्रिकेट कारकिर्दीत ५०० सामन्यांचा आकडा पार केला आहे. यामध्ये श्रीलंकाच्या सनथ जयसूर्या, माहेला जयवर्धने तसेच कुमार संगाकारा यांचा समावेश होतो. शिवाय, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग, दक्षिण आफ्रिकाचा महान अष्टपैलू क्रिकेटपटू जॅक्स कॅलिस यांनीदेखील ५००पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
भारताबाबतीत पाहायचे झाले तर, आजवर फक्त ३ भारतीय क्रिकेटपटूंनी ५०० पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
तर बघूयात कोण आहेत ते ३ भारतीय खेळाडू ज्यांनी कसोटी, वनडे आणि टी२० असे मिळून ५००पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत- Indian Players Played More Than 500 International Matches
सचिन तेंडुलकर –
क्रिकेटविश्वात आपली एक नवी ओळख निर्माण करणारा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याच्या नावावर आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम आहे. क्रिकेटविश्वात सचिन हा एकमेव क्रिकेटपटू आहे ज्याने २०० कसोटी सामने खेळले आहेत. तर, आपल्या २४ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत सचिनने ४६३ वनडे सामने खेळले आहेत. तर, केवळ १ टी२० सामना खेळत सचिनने ६६४ आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा पराक्रम केला आहे.
एमएस धोनी –
भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी हा जगातील सर्वश्रेष्ठ कर्णधारांपैकी एक आहे. धोनी त्याच्या नेतृत्त्वासह फलंदाजीतही तेवढाच पारंगत आहे. वनडे क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट फिनिशर मानला जाणाऱ्या धोनीने ३५० वनडे सामने खेळले आहेत. तसेच, ९८ टी२० आणि ९० कसोटी सामन्यात तो भारतीय संघाकडून खेळला आहे. यासह धोनीने त्याच्या आतापर्यंत एकूण ५३८ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
राहुल द्रविड –
‘द वॉल’ नावाने प्रचलित राहुल द्रविड हादेखील भारताकडून ५००पेक्षा जास्त सामने खेळणाऱ्यांच्या यादीत सामील आहे. सचिनप्रमाणे फक्त १ टी२० सामना खेळणाऱ्या द्रविडने ३४४ वनडे आणि १६४ कसोटी सामने खेळले आहेत. अशाप्रकारे आपल्या १६वर्षांच्या क्रिकेट कारिकिर्दीत द्रविडने एकूण ५०९ सामने खेळले आहेत.
अन्य कुणाला आहे ही संधी-
ख्रिस गेलच्या नावावर ४६२ आंतरराष्ट्रीय सामने आहेत. परंतु त्याच्या निवृत्तीबद्दल अजून कोणतीही ठोस माहिती नाही. तो जर खेळला तर त्याला हा विक्रम करण्याची नक्कीच संधी आहे.
शोएब मलिक (४३५), राॅस टेलर (४३३) व विराट कोहली (४१६) हे सध्या खेळत असलेले असे खेळाडू आहेत, ज्यांनी ४०० पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
ट्रेंडिंग लेख-
अशा ३ प्रकारे फलंदाज फारच कमी वेळा झालेत बाद
पराभुत वनडे सामन्यात सर्वाधिक सामनावीर पुरस्कार मिळवणारे ५ फलंदाज
कसोटीत पाचही दिवस टिच्चून फलंदाजी करणारे जगातील १० फलंदाज; ३ नावे आहेत भारतीय