भारतीय क्रिकेट संघाचा वरिष्ठ आणि अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिकने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात अत्यंत आव्हानात्मक खेळपट्टीवर खेळलेल्या खेळीचे अनेक जण कौतुक करत आहेत. कार्तिकच्या खेळीच्या जोरावरच भारतीय संघाने १९० धावांपर्यंत मजल मारलेदी. त्याच्या नाबाद ४१ धावांमुळे त्याला सामनावीर म्हणून देखील निवडण्यात आले. ३७ वर्षीय कार्तिकच्या खेळीच्या जोरावर भारताने ६८ धावांनी विजय मिळवला.
दिनेश कार्तिक आयपीएलच्या पंधराव्या हंगामापासून आपल्या खेळाच्या जोरावर भारतीय टी२० संघाचा एक महत्त्वाचा सदस्य बनला आहे. अत्यंत यशस्वी पुनरागमन करत तो फिनिशरची भूमिका अतिशय चांगल्याप्रकारे पार पाडत आहे. आता टी२० विश्वचषक सुरू होण्यास जवळपास तीन महिने बाकी आहेत. बीसीसीआयच्या एका निवडकर्त्याने संकेत दिले आहेत की, त्याची विश्वचषक संघातील आपली जागा निश्चित झाली आहे.
एका क्रीडा संकेतस्थळाशी बोलताना बीसीसीआयच्या निवडकर्त्याने सांगितले की,
“आता दिनेश कार्तिकला कोण रोखू शकते? ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी२० विश्वचषकासाठी तो निश्चितपणे संघात असेल. त्याच्या खेळात सातत्य आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो त्याला दिलेल्या जबाबदारीसह तो सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. त्याचा अनुभव संघासाठी खूप मोलाचा असेल.”
ते पुढे म्हणाले की, “दिनेश कार्तिकच्या निवडीबाबत आतापर्यंत कोणतीही औपचारिक चर्चा झाली नाही. मात्र, जेव्हा आपण अनौपचारिकपणे बोलतो तेव्हा प्रत्येकजण त्याच्यावर आणि त्याच्या खेळाने प्रभावित असल्याचे सहज जाणवते.”
दिनेश कार्तिकला पहिल्या टी२० सामन्यात खेळलेल्या खेळीसाठी सामनावीर म्हणून निवडण्यात आले. पारितोषिक वितरण समारंभात बोलताना कार्तिकने सांगितले की,” मी माझ्या भूमिकेचा पुरेपूर आनंद घेत आहे. फिनिशरची भूमिका खूप मनोरंजक असते आणि तुम्हाला कर्णधार आणि प्रशिक्षकाच्या पाठिंब्याची गरज असते. मला दोघांचा पाठिंबा आहे आणि पुढेही माझ्या चांगल्या कामगिरीवर लक्ष देणार आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
आनंदाची बातमी! क्रिकेटच्या मैदानात पुन्हा होणार ‘दादागिरी’, कसं ते घ्या जाणून
CWG 2022: टपरी चालवणाऱ्या बापाचे कष्ट फळले! २१व्या वर्षी मुलाने भारताला मिळवून दिलं पदक
‘द्रविडच्या विचारांचा संघाला फायदा नाही’, महत्त्वाच्या खेळाडूला बाहेर ठेवल्यामुळे भडकला माजी दिग्गज