शिखर धवन याच्या नेतृत्वात भारताच्या युवा क्रिकेटपटूंनी दक्षिण आफ्रिकेविरुद्धची एकदिवसीय मालिका 2-1 अशा अंतराने जिंकली. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी या मालिकेत चमकदार कामगिरी करणाऱ्यांपैकी एक राहिला. आफ्रिकी संघाविरुद्धच्या या मालिकेनंतर त्याने भारताच्या एकदिवसीय संघातील स्वतःचे स्थान अधिकच भक्कम केले आहे. तिसरा सामना संपल्यानंतर प्रेंजेंटर मुरली कार्तिकने हैदराबादीमध्ये सिराजचे कौतुक केले.
मुरली कार्तिक (Murali Karthik) हातात माइक पकडून म्हणाला की, “‘मिया क्या बॉलिंग करते है.’ हैदराबादीत बरोबर म्हणालो ना, असे म्हणतात.” यावेळी मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) याच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्टपणे दिसत होता. पाठीमागून चाहते देखील त्याचा प्रोत्साहन देत होते. मुरली कार्तिकच्या या कौतुकानंतर सिराज म्हणाला की, “एका चांगल्या संघाविरुद्ध प्रदर्शन केल्यानंतर तुम्हाला खूप आत्मविश्वास मिळतो. मला जबाबदारी घ्यावी लागली. मी डावाच्या सुरुवातीपासून योग्य लेंथ मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. एका वेगवान गोलंदाजाच्या रूपात तुम्हाला स्वतःमध्ये एक आग आणि उत्साह हवा असतो. मी माझे प्रदर्शन आणि मालिकावीर ठरल्यामुळे आनंदी आहे.”
सिराजचे या एकदिवसीय मालिकेतील प्रदर्शन पाहिले, तर त्याने तीन सामन्यात एकूण पाच विकेट्स घेतल्या आहेत. रांचीमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात त्याने तीन विकेट्स घेतल्या, तर दिल्लीत खेळलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने दोन विकेट्स नावावर केल्या. तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात सिराजने संघासाठी खरोखर किफायतशीर गोलंदाजी केली, असे म्हणता येईल. त्याने 5 षटका टाकत 17 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट्सही मिळवल्या. या सामन्यात सिराजव्यतिरिक्त कुलदीप यादव सर्वाधिक 18 धावा खर्च करून 4 विकेट्स नावावर करू शकला. वॉशिंगटन सुंदर आणि शाहबाज अहमद यांनीही प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या.
मालिकेतील या शेवटच्या सामन्यात भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे आफ्रिकी संघ 21.1 षटकात अवघ्या 99 धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात भारतीय संघाने हे लक्ष्य गाठताना तीन विकेट्स गमावल्या आणि 19.1 षटकात विजय मिळवला. तत्पूर्वी मालिकेतील पहिला सामना लखनऊमध्ये खेळला गेला होता, ज्यामध्ये भारताला 9 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
टी20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघाला नाही तसलं बोलला इंग्लंडचा दिग्गज, वाचून तळपायाची आग जाईल मस्तकात
हा ठरला क्रिकेट इतिहासातील पहिला ‘इम्पॅक्ट प्लेयर’! मुंबई इंडियन्ससाठी दाखवलाय दम