मुंबई । भारत सरकारने बीसीसीआयला युएईमध्ये आयपीएल 2020 चे आयोजन करण्यास परवानगी दिली तेव्हापासून फ्रेंचायझी निघण्याची तयारी करत आहेत. 19 सप्टेंबरपासून सुरू होणार्या या स्पर्धेपूर्वी रविवारी गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर (एसओपी) तयार करण्यात आले. त्यानुसार आयपीएलमध्ये भाग घेणाऱ्या खेळाडूंना कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी सज्ज करण्यात आले आहे. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जच्या कँपमधून कर्णधार एमएस धोनी आणि त्यांच्या संघाच्या कोरोना चाचणीबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, जेव्हा सीएसकेच्या अधिकार्याकडून त्यांच्या खेळाडूंची कोरोना टेस्ट कधी करणार आणि त्यांचे खेळाडू युएईमध्ये कसे येतील याबद्दल विचारले असता, ते म्हणाले की, ‘सीएसके टीम प्रथम खेळाडूंची कोरोना चाचणी घेईल आणि त्यानंतरच खेळाडू चेन्नईला येतील. संघ चेन्नईला पोचल्यानंतर 48 तासांच्या आत युएईला रवाना होईल.’
मिळालेल्यानुसार, 20 ऑगस्टपूर्वी आयपीएलचा कोणताही संघ युएईला जाऊ शकत नाही. अशा परिस्थितीत असे मानले जाते की चेन्नई संघातील खेळाडूंची चाचणी 18 किंवा 19 ऑगस्ट रोजी होऊ शकते.
चेन्नई सुपर किंग्जच्या अधिकार्याने सांगितले की, सरकारच्या मंजुरीनंतरच संघाच्या खेळाडूंच्या व्हिसा प्रक्रियेस सुरवात होईल. त्यांच्या मते, सीएसकेचे अधिकारी आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलशी सतत संपर्कात आहेत. गुरुवारी स्पर्धेचे एसओपी जाहीर करण्यात येणार आहे. चेन्नई सुपरकिंग्ज प्रथम युएईपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे. चेन्नई संघाला लवकरात लवकर युएईला जाण्याची इच्छा होती परंतु बीसीसीआयने 20 ऑगस्टपर्यंत कोणत्याही संघाला युएईमध्ये जाण्याचे आदेश दिले नाहीत.
चेन्नई सुपरकिंग्जचा संघ भारतात प्रशिक्षण शिबीर आयोजित करणार होते, परंतु आता तसे होणे अवघड आहे. चेन्नई संघात धोनी, हरभजन सिंग, सुरेश रैना, अंबाती रायुडू असे खेळाडू आहेत जे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत नाहीत आणि ते बहुतेक आयपीएलमध्ये क्रिकेट खेळतात. यामुळेच चेन्नईचा संघ आपला क्रिकेट शिबिर प्रथम सुरू करण्याच्या विचारात आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
कुठे व कधी पाहाणार आयपीएल २०२०, जाणून घ्या यावेळी होत असलेल्या आयपीएलबद्दल सर्वकाही
-माजी क्रिकेटर राहुल द्रविड पुन्हा आला टीम इंडियाच्या मदतीला, आता सांभाळणार ही जबाबदारी
-धोनीच्या कोरोना चाचणीबद्दल आले मोठे वृत्त, सीएकेच्या अधिकाऱ्याने दिली माहिती
ट्रेंडिंग लेख-
-आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या ५ बहीण-भावांच्या जोड्या…
-वनडे क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक चेंडू खेळणारे टॉप ५ फलंदाज….
-एकाच वनडे सामन्यात सलामीला फलंदाजी आणि गोलंदाजी करणारे ५ भारतीय खेळाडू…