नवी दिल्ली। भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या वतीने यावर्षी युएईमध्ये होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगसाठी सर्व संघ युएईला पोहोचले असून आयपीएल संघांशी संबंधित सर्व परदेशी खेळाडू हळू हळू त्यांच्या संघात सामील होत आहे. आयपीएलमध्ये जगभरातील खेळाडू भाग घेतात पण या लीगमध्ये पाकिस्तानशी संबंधित कोणतेही खेळाडू किंवा समालोचक सहभागी होऊ शकत नाहीत. परंतु जगातील नामांकित टी२० लीगच्या एका संघाचे मालक पाकिस्तानात आहेत, हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. त्यांचे नाते मोहम्मद अली जिन्नाशी आहे.
आपण ज्या संघाबद्दल बोलत आहोत त्याचे नाव किंग्ज इलेव्हन पंजाब असे आहे. सहसा जेव्हा या संघाचे नाव घेतले जाते, तेव्हा चाहत्यांनी अधिक तर अभिनेत्री प्रीती झिंटाला मालक म्हणून पाहिले आहे. तिच्याशिवाय आणखी २ लोकांचाही फ्रँचायझीमध्ये वाटा आहे.
प्रिती झिंटासोबत बर्याच काळापासून होते संबंध
विशेष म्हणजे भारतीय व्यापारी नेस वाडिया हे किंग्ज इलेव्हन पंजाबचे सह-मालक आहेत. परंतु पाकिस्तानची पायाभरणी करणाऱ्या मोहम्मद जिन्ना यांचे ते पणतू आहेत, हे फारच कमी लोकांना ठाऊक आहे. ते जिन्नांची एकुलती एक मुलगी दिना यांचे नातू आहेत. वाडियाने प्रिती झिंटाला बरेच दिवस डेट केले आहे.
बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा भारतात खूप लोकप्रिय आहे. सुरुवातीला नेस वाडियाबरोबर तिने ही टीम विकत घेतली होती, त्यावेळी तो तिचा प्रियकर होता. बहुतेक सामन्यांमध्ये प्रीती स्टँडमध्ये दिसते तसेच ती टीमला चीअर करतानाही दिसते.
करण पॉल यांचा भारतातील सर्वात जुन्या व्यावसायिक गटात समावेश आहे
संघाचे तिसरे मालक करण पॉल हे भारतातील बड्या उद्योजकांपैकी एक आहेत. ते एपीजे सुरेंद्र ग्रुपचे मालक आहेत, जो भारतातील सर्वात जुन्या व्यावसायिक गटांपैकी एक आहे. या गटाची सुरुवात १९१० मध्ये झाली आणि आज रिटेल, रिअल इस्टेट, शिपिंग यांसारख्या अनेक क्षेत्रांत त्यांचा समावेश आहे.
केएल राहुलच्या नेतृत्वात पंजाबला जिंकायचे आहे पहिले विजेतेपद
किंग्ज इलेव्हन पंजाबने आजवर कधीही आयपीएलचे विजेतेपद जिंकलेले नाही. परंतु यावेळी केएल राहुलच्या नेतृत्वात त्यांना आयपीएलचे विजेतेपद जिंकण्याची मोठी आशा आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-धोनीच्या निवडीबाबत माजी प्रशिक्षकाचे मोठे विधान; म्हणतात, गांगुलीची इच्छा…
-इंग्लंडमधील हा क्रिकेटपटू जातीवादामुळे झाला होता आत्महत्या करण्यास प्रवृत्त
-बापरे! दुबईला गेलेल्या बीसीसीआयच्या अधिकाऱ्याला झाली कोरोनाची लागण
ट्रेंडिंग लेख-
-भारताचे २ दिग्गज फलंदाज, ज्यांनी आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये ठोकले वेगवान शतक
-आयपीएलचे सितारे: कृणाल पंड्या, रवींद्र जडेजा यांना टक्कर देणारा २० वर्षीय अभिषेक शर्मा
-युएईमध्ये खेळताना आयपीएलमधील एका षटकात सर्वाधिक धावा करणारे ३ दिग्गज