आयपीएल २०२० ची सुरुवात आज (१९ सप्टेंबर) मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील सामन्याने होणार आहे. आतापर्यंत, १२ हंगामात अनेक अविश्वसनीय विक्रम नोंदवले गेले आहेत. आयपीएलमधील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक आर अश्विनला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा कर्णधार विराट कोहली एकदाही बाद करता आले नाही. विराटने त्याच्या गोलंदाजीवर १५२ धावा केल्या आहेत.
अशाच प्रकारे आणखी काही अनोखे विक्रम आहेत
१- धोनीने आयपीएलमध्ये आपल्या ४९.७९% (२२०६) धावा शेवटच्या चार षटकात केल्या आहेत.
२- शिखर धवनने हैद्राबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर १३७८ धावा केल्या आहेत. कोणत्याही फलंदाजाकडून एकाच मैदानात एकदाही शून्यावर बाद न होता केलेल्या या सर्वात जास्त धावा आहेत.
३- धोनीने आपल्या आयपीएल कारकिर्दीत २२% (४६) षटकार २० व्या षटकात मारले आहेत.
एका गोलंदाजाविरुद्ध सर्वाधिक षटकार
फलंदाज- कायरन पोलार्ड गोलंदाज- अमित मिश्रा षटकार- १४ चेंडू- ७९
फलंदाज- ख्रिस गेल गोलंदाज- पीयुष चावला षटकार- ११ चेंडू- ६४
फलंदाज- सुरेश रैना गोलंदाज- पीयुष चावला षटकार- १० चेंडू-१०१
फलंदाज- आंद्रे रसेल गोलंदाज- मोहम्मद शमी षटकार- १० चेंडू- २६
फलंदाज- ग्लेन मॅक्सवेल गोलंदाज- कर्ण शर्मा षटकार- ९ चेंडू- २८
एका संघाविरुद्ध सर्वाधिक विकेट्स
गोलंदाज- लसिथ मलिंगा विरोधी संघ- चेन्नई सुपर किंग्ज विकेट्स- ३१
गोलंदाज- अमित मिश्रा विरोधी संघ- राजस्थान रॉयल्स विकेट्स- ३०
गोलंदाज- उमेश यादव विरोधी संघ- किंग्ज इलेव्हन पंजाब विकेट्स- २९
गोलंदाज- ड्वेन ब्राव्हो विरोधी संघ- मुंबई इंडियन्स विकेट्स- २८
गोलंदाज- भुवनेश्वर कुमार विरोधी संघ- कोलकाता नाईट रायडर्स विकेट्स- २७
प्रमुख फलंदाज सर्वाधिक वेळा या गोलंदाजांचे शिकार बनले आहेत
फलंदाज- एमएस धोनी गोलंदाज- झहीर खान विकेट्स (वेळा)- ७
फलंदाज- विराट कोहली गोलंदाज- आशिष नेहरा, संदीप शर्मा विकेट्स (वेळा)- ६
फलंदाज-रोहित शर्मा गोलंदाज- सुनिल नरेन, अमित मिश्रा विकेट्स (वेळा)- ६
फलंदाज-ख्रिस गेल गोलंदाज- हरभजन सिंग विकेट्स (वेळा)- ५
फलंदाज-डेव्हिड वॉर्नर गोलंदाज- हरभजन सिंग विकेट्स (वेळा)- ५
सर्वाधिक वेळा ७५ पेक्षा जास्त धावा करणारे फलंदाज
२२ वेळा- ख्रिस गेल
१६ वेळा- डेव्हिड वॉर्नर
१४ वेळा- विराट कोहली
१२ वेळा- एबी डिविलिअर्स
११ वेळा- सुरेश रैना
ट्रेंडिंग लेख-
-आजच्याच दिवशी युवराजने ६ चेंडूत ६ षटकार मारत रचलेला होता इतिहास, पहा व्हिडिओ
-‘उजव्या हाताचा रिषभ पंत’ अशी ओळख असलेला मोहरा आयपीएल गाजवणार
-आयपीएल २०२०: सर्व ८ संघांच्या खेळाडूंची संपूर्ण यादी
महत्त्वाच्या बातम्या-
-या कारणामुळे चाहते धोनीवर चिडले; सोशल मीडियावर घेतला समाचार
-आयपीएलमध्ये फक्त ‘याच’ देशातील मीडियाला असेल परवानगी
-प्रसिद्ध निवेदिका मयंती लँगर कॉमेंट्री पॅनलमधून बाहेर; कारणही आहे तसे खास