भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा आज जगातील आघाडीचा गोलंदाज आहे. आपल्या भेदक गोलंदाजीने त्याने जगातल्या भल्याभल्या गोलंदाजांना जेरीस आणले आहे. त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द अजूनही नवीन असली तरी देखील त्यात त्याने जबरदस्त छाप पाडली आहे. आपल्या शानदार प्रदर्शनाने अनेक क्रिकेटपटूंचा तो आदर्श आहे. यात आता एका आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटूची देखील भर पडली आहे.
‘ही’ क्रिकेटपटू आहे बुमराहची चाहती
जसप्रीत बुमराहचे अनेक चाहते जगभरात आहे. यात आता एका महिला क्रिकेटपटूची देखील भर पडली आहे. ही क्रिकेटपटू म्हणजे दुसरी-तिसरी कोणी नसून आयर्लंडची महिला क्रिकेटपटू ओर्ला प्रेंडरगॅस्टो आहे. तिने भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आपला सर्वाधिक पसंतीचा क्रिकेटपटू असल्याचे विधान केले आहे. ओर्ला देखील एक वेगवान गोलंदाज आहे. तिने बुमराह आपला आदर्श असल्याचे सांगितले आहे.
ओर्ला प्रेंडरगॅस्टो ही उजव्या हाताने वेगवान गोलंदाजी करते. तिने आयर्लंडकडून एकूण आठ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळले आहेत. यात तिने एकूण आठ विकेट्स पटकावल्या आहेत. ज्यात ४.८० ची शानदार सरासरी तिने राखली आहे.
जसप्रीत बुमराहची कारकीर्द
जसप्रीत बुमराहने २०१६ साली भारताकडून पदार्पण केले होते. त्याने आत्तापर्यंत १९ कसोटी सामन्यात २२.११ च्या सरासरीने तब्बल ८३ विकेट्स घेतल्या आहेत. तर ६७ वनडे सामने खेळतांना २५.३३ च्या सरासरीने १०८ विकेट्स घेतल्या आहेत. टी२० सामन्यात देखील त्याने शानदार कामगिरी केली असून एकूण ४९ सामने खेळतांना त्याने २०.२५ च्या सरासरीने ५९ विकेट्स घेतल्या आहेत. विशेष म्हणजे यात त्याचा इकॉनॉमी रेट अवघा ६.६७ इतका आहे. सुरुवातीला केवळ टी२० गोलंदाज म्हणून ओल्कःला जाणारा बुमराह आता तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये सहजतेने खेळतो. त्यामुळे आगामी काळात देखील भारताकडून खेळतांना त्याने नवनवीन विक्रम रचले नाही, तरच नवल.
महत्त्वाच्या बातम्या –
“भारताच्या महिला क्रिकेटपटूंना प्लेयर्स असोसिएशनची नितांत गरज”, माजी खेळाडूचे प्रतिपादन
पंड्या बंधूंनी पाळला शब्द! कोरोना रूग्णांना दिली ‘ही’ मदत