रमझानच्या महिन्यात भारतीय संघाचे अनेक दिग्गज खेळाडूदेखील रोजा (उपवास) ठेवतात. यामध्ये इरफान पठाण आणि युसूफ पठाणचाही समावेश आहे. तरी इरफानकडून सोमवारी (११ मे) एक चूक झाली.
तो आपल्या घरामध्ये मुलाबरोबर आणि युसूफबरोबर बसला होता. त्याचवेळी त्याने अचानक पाणी पिऊन घेतले. यानंतर युसूफने (Yusuf Pathan) इरफानला आठवण करून दिली की आज तुझा रोजा आहे, हे ऐकूण इरफानला आपल्या चूक (Mistake) समजली. Irfan Pathan Drink water during Ramadan by mistake video viral
रोजाच्या दरम्यान अनेकांकडून चूक होते आणि ते पाणी पितात. असेच काहीतरी इरफानबरोबरही झाले होते. यावर इरफानने चाहत्यांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न केला. इरफानने (Irfan Pathan) अशाच एका चूकीचा एक व्हिडिओ आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला. या व्हिडिओला कॅप्शन देत त्याने लिहिले की, “ही चूक कोणा-कोणाकडून झाली आहे?”
Ye galti kis kis se hui hai??😂 #Ramadan #mistake #love #family @iamyusufpathan pic.twitter.com/9oVgXJYOJN
— Irfan Pathan (@IrfanPathan) May 11, 2020
इरफानने शेअर केलेला हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. त्याला चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणावर पसंती मिळत आहे. अनेकांनी कमेंट करत म्हटले की, अशी चूक होतं असते. परंतु अल्लाह आपल्या लोकांना क्षमा करतो.
एका चाहत्याने लिहिले की, नवरात्रीच्यादरम्यान तेदेखील चूकून काही ना काही खातात, तेव्हा अचानकपणे आठवते की, अरे आज तर उपवास होता.
Humare navratri k vrat me jab hum chote the to kabhi kabhi to galti se namkeen ya koo fvrt chij dikh jaaye to fast bhul kar jab kha lete the tab achanak yaad aaye ki oh yaar nahi khana tha ye
— Rahul Singh🇮🇳 ❁ (@diiaryofamadman) May 11, 2020
इरफानने भारताकडून २९ कसोटी सामने, १२० वनडे सामने आणि २४ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. यात त्याने कसोटीत ११०५, वनडेत १५४४ आणि टी२०त १७२ धावा केल्या आहेत. याव्यतिरिक्त त्याने कसोटीत १००, वनडेत १७३ आणि टी२०त २८ विकेट्सही पटकाविल्या आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी-
-एवढी चांगली वनडे कारकिर्द असतानाही रोहितला आहे या गोष्टीची खंत
-बांगलादेशच्या माजी खेळाडूचा वसीम अक्रमवर गंभीर आरोप, म्हणतो त्याने माझ्या…
-केएल राहुल म्हणतो, युवीचा विक्रम मोडणार ‘हा’ खेळाडू