भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ९ जूनपासून मायदेशातील टी-२० मालिका सुरू होणार आहे. पाच सामन्यांच्या या मालिकेसाठी बीसीसीआयने १८ सदस्यांचा भारतीय संघ घोषित केला आहे. ज्या खेळाडूंना या मालिकेसाठी निवडले आहे, त्यातील अनेकजण युवा आहेत आणि त्यांनी आयपीएल २०२२मध्ये चांगले प्रदर्शन केले आहे. आता यापैकी कोणत्या ११ खेळाडूंना प्रत्यक्षात खेळण्याची संधी मिळते हे पाहावे लागणार आहे. आपण या लेखात तीन अशा खेळाडूंची माहिती घेणार आहोत, ज्यांच्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा बनवणे सोपे नसेल.
१. रवी बिश्नोई
युवा फिरकी गोलंदाज रवी विश्नोई (Ravi Bishnoi) याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी १८ सदस्यीस संघात निवडले गेले आहे. असे असले, तरी प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणे त्याच्यासाठी सोपी गोष्ट नसेल. कारण संघात दिग्गज फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल देखील आहे. चहलला बाहेर बसवून विश्नोईला संधी देणे हे सध्या तरी अशक्य दिसत आहे. चहल आयपीएल २०२२मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे. अशात भारतीय संघसाठी त्याचा हा उत्कृष्ट फॉर्म फायद्याचा ठरू शकतो.
२. ऋतुराज गायकवाड
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याला देखील निवडले गेले आहे. ऋतुराज गायकवाड एक सलामीवीर फलंदाज आहे, पण संघात आधीपासूनच फलंदाजांची भरमार असल्यामुळे ऋतुराजला संधी मिळणे कठीण असणार आहे. जर नशिबाची साथ मिळाली, तर मात्र त्याला संधी मिळू शकते. आयपीएल २०२२मध्येही तो अपेक्षित प्रदर्शन करू शकला नाही. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तो फक्त इतर खेळाडूंना पाणी पाजतानाच दिसू शकतो.
३. अक्षर पटेल
अक्षर पटेलने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या मायदेशातील मालिकेसाठी भारतीय संघात पुनरागमन केले आहे, पण प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याची निवड होणे सोपे दिसत नाही. अक्षर पटेल (Axar Patel) एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे आणि त्याने आयपीएल २०२२ हंगामात चांगले प्रदर्शन देखील केले आहे. परंतु आयपीएलनंतर अष्टपैलू हार्दिक पंड्याने देखील भारतीय संघात पुनरागमन केले असून त्याला अक्षर पटेलपेक्षा अधिक महत्व मिळण्याची शक्यता आहे. हार्दिक पंड्यामुळे अक्षरला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसावे लागू शकते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
Bando Mein Tha Dum। ऑस्ट्रेलियातील भारताच्या ऐतिहासिक विजयावर आधारित वेब सीरिजचा ट्रेलर रिलीझ
‘बजरंग बली’ सुरेश रैना! मिस्टर आयपीएलने हाती गदा घेऊन केला वर्कआऊट, Video तुफान व्हायरल
तळागाळापर्यंत टेनिसच्या प्रसारासाठी एमएसएलटीएसोबत पीसीएमसीचा पुढाकार