इंग्लंड विरुद्ध भारत दरम्यान सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजांने कमाल करत इंग्लंड संघाला १८३ धावतच गुंडाळले. नंतर भारतीय संघ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला तेव्हा, भारतीय संघाची सुरुवात चांगली राहिली होती. रोहित शर्मा आणि केएल राहुलने पहिल्या विकेटसाठी ९७ धावांची भागीदारी केली. मात्र, त्यानंतर भारतीय संघाने १५ धावांतच ४ विकेट्स गमावल्या. ज्यात कर्णधार विराट कोहली जेम्स अँडरसनविरुद्ध खेळताना आपल्या पहिल्याच चेंडूवर बाद झाला.
३९ वर्षीय अँडरसन हा इंग्लंड संघाकडून सर्वात जास्त कसोटी सामने खेळणारा खेळाडू आहे. असे असले तरी, अजूनही त्याची गोलंदाजी तेवढीच अनुभवी आणि जलदगतीची आहे. भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी अँडरसनने चेतेश्वर पुजारा आणि कोहली सारख्या खेळाडूंना लागोपाठच्या चेंडूवर माघारी पाठवले. ज्यात कोहलीला पहिल्याच चेंडूवर ‘गोल्डन डक’ झाला.
अँडरसनने जेव्हा कोहलीची विकेट घेतली. तेव्हा त्याने जोरदार आनंद साजरा केला. अँडरसन क्वचितच अशाप्रकारे त्याला मिळालेली विकेट साजरी करतो. जेव्हा त्याला याबद्दल विचारले, तेव्हा तो म्हणाला, “कोहलीला एवढ्या स्वस्तात बाद करणे, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती”.
त्यानंतर आभासी पत्रकार परिषदेत तो म्हणाला, “मी कोहलीला याच्या आधीही अशाप्रकारे गोलंदाजी केली आहे. यात जास्त वेळा तर तो चेंडू सोडून देतो. परंतु, ही विकेट माझ्यासाठी अत्यंत मोठी विकेट होती. कारण कोहलीला एवढ्या लवकर आऊट करणे, ही साधी गोष्ट नाही, त्यामुळे मी माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकलो नाही”.
क्रिकेट तज्ञांच्या मते, अँडरसनने कोहलीसाठी जशी गोलंदाजी केली होती. ती अत्यंत उल्लेखनीय अशी गोलंदाजी होती. अँडरसनचा तो चेंडू स्विंग होईल असा वाटत होता. परंतु चेंडू सीम झाला. त्यामुळे चेंडू कोहलीच्या बॅटला लागून थेट यष्टीरक्षकाच्या हातात गेला. अँडरसनने २०१४ नंतर पहिल्यांदाच कोहलीची विकेट घेतली आहे.
WOWWWW! 🔥@jimmy9 gets Kohli first ball and Trent Bridge is absolutely rocking!
Scorecard/Clips: https://t.co/5eQO5BWXUp#ENGvIND pic.twitter.com/g06S0e4GN7
— England Cricket (@englandcricket) August 5, 2021
दरम्यान, याच्याही आधी कोहली ‘गोल्डन डक’ म्हणजे पहिल्या चेंडूवर बाद झाला होता. इंग्लंड विरुद्ध तिसऱ्यांदा कोहली शून्यावर बाद झाला आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज विरुद्ध देखील कोहली १-१ वेळा शून्यावर बाद झाला आहे. मागील काही काळापासून कोहलीचा फॉर्म हरवलेला दिसतो आहे. २०२० पासून कोहलीची कसोटीमधील सरासरी ३० च्या आत आहे. त्यामुळे फॉर्म मिळविण्यासाठी कोहलीला हा दौरा अत्यंत महत्वाचा आहे.
महत्वाच्या बातम्या –
–मोहम्मद सिराजने चेंडू चमकवण्यासाठी केले ‘असे’ कृत्य; व्हिडिओ होतोय व्हायरल
–माजी निवडकर्त्याकडून डिव्हिलियर्सवर वर्णभेद केल्याचे गंभीर आरोप; मिस्टर ३६०ने दिले ‘असे’ उत्तर
–टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक विजेत्या खेळाडूचा स्वेटर विणून झाला पूर्ण; अनुष्का शर्मानेही केले कौतुक