भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात 5 सामन्यांची बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी (Border Gavaskar Trophy) स्पर्धा खेळली जात आहे. त्यातील तिसरा कसोटी सामना ब्रिस्बेन, गाबाच्या मैदानावर रंगला आहे. गाबा कसोटीत जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि आकाश दीप (Akash Deep) या जोडीने फलंदाजीत रेकाॅर्ड केला. जे 21व्या शतकात यापूर्वी कोणीही करू शकले नव्हते. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत, बुमराह, आकाशने 10व्या विकेटसाठी 39*(54) धावांची भागीदारी केली.
यापूर्वी, गाबा कसोटीत भारतासाठी 10व्या विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी 1991 मध्ये झाली होती, जी मनोज प्रभाकर आणि जवागल श्रीनाथ यांनी केली होती. बुमराह आणि आकाशच्या आधी, गाबा कसोटीत भारतासाठी 10व्या विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी 33 धावांची होती, जी मनोज प्रभाकर आणि जवागल श्रीनाथ यांच्यात होती. आता बुमराह आणि आकाशदीपने 39* धावांची भागीदारी केली आहे.
सामना सुरू असताना भारताला फॉलोऑन मिळेल असे वाटत असताना जसप्रीत बुमराह आणि आकाश दीपच्या शानदार भागीदारीने संघाला फॉलोऑनपासून वाचवले. चौथ्या दिवसअखेर दोघांनी 10व्या विकेटसाठी 39* धावांची उत्कृष्ट भागीदारी रचली.
आता पावसामुळे गाबा कसोटीत चांगलीच अडचण निर्माण झाली आहे. पावसामुळे पहिल्या दिवशी केवळ 13.2 षटकांचाच खेळ होऊ शकला. यानंतर दुसऱ्या दिवशी संपूर्ण खेळ झाला तर तिसऱ्या दिवशीही पावसामुळे अडचण निर्माण झाल्यामुळे दिवसभराचा खेळ होऊ शकला नाही. त्यानंतर चौथ्या दिवशीही पावसाने खोळंबा घातला. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघाने 252/9 धावा केल्या आहेत. बुमराह आणि आकाश दीप संघासाठी नाबाद परतले. आता भारतीय संघ 193 धावांनी पिछाडीवर आहे.
गाबा कसोटीत भारतासाठी 10व्या विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी-
जसप्रीत बुमराह आणि आकाश दीप- 39* धावा (2024)
मनोज प्रभाकर आणि जवागल श्रीनाथ- 33 धावा (1991)
मोटागनहल्ली जयसिम्हा आणि उमेश कुलकर्णी- 22 धावा (1968)
वेंकटपथी राजू आणि जवागल श्रीनाथ- 14 धावा (1991)
इशांत शर्मा आणि उमेश यादव – 14 धावा (2014)
महत्त्वाच्या बातम्या-
VIDEO; कोहलीच्या बॅटने आकाश दीपनं ठोकला षटकार! अन् कोहली, रोहितसह गंभीरचा आनंद गगनात मावेना
“माझे स्वप्न विराट कोहलीला भेटायचे आहे” स्टार खेळाडूने व्यक्त केली इच्छा
सूर्यकांत व्यायाम शाळा, दुर्गामाता स्पोर्टस्, विजय नवनाथ यांची विजयी सलामी






