इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथा कसोटी सामना ओव्हलच्या मैदानावर सुरू आहे. दरम्यान, इंग्लंड संघाचा यष्टिरक्षक फलंदाज जोस बटलरसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. बटलरच्या घरी नव्या पाहुणीचे आगमन झाले आहे. ज्याची माहिती राजस्थान रॉयल्स संघाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करण्यात आली आहे.
जोस बटलर दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. त्याला कन्यारत्न प्राप्ती झाली आहे. जोस बटलर आणि त्याची पत्नी लुईस वेबरने मिळून तिचे नाव ‘मॅगी’ असे ठेवले आहे. त्यांच्या पहिल्या मुलीचे नाव जॉर्जिया रोज आहे. तिचा जन्म एप्रिल २०१९ मध्ये झाला होता.
राजस्थान रॉयल्सने फोटो शेअर करत दिली माहिती
राजस्थान रॉयल्स संघाचे सोशल मीडिया अकाऊंट प्रचंड सक्रीय असते. त्यामुळे ते खेळाडूंच्या आयुष्यात घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करत असतात. त्यांनी बटलरचे दोन फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये जोस बटलर त्याची पत्नी लुईस वेबर आपल्या दोन्ही मुलींसह दिसून येत आहेत. या फोटोवर त्यांनी कॅप्शन म्हणून,”जोसची मुलगी आली आहे! रॉयल्स कुटुंबात तुझे स्वागत आहे मॅगी…”(Jos Buttler becomes Father second time, his wife give birth to daughter Maggie on 5th September)
🗓️ 5th Sept: Jos Baby is here! 👶
Welcome to the #RoyalsFamily, Maggie. 💗 pic.twitter.com/s3EHHVFfH4
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) September 5, 2021
बटलरने क्रिकेटमधून घेतली विश्रांती
जोस बटलरने आपल्या दुसऱ्या मुलीच्या जन्मासाठी क्रिकेटमधून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात सुरू असलेल्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतून तीन सामन्यांनंतर माघार घेतली आहे. बटलरने या मालिकेतील पहिल्या ३ कसोटी सामन्यात इंग्लंड संघाचे प्रतिनिधित्व केले होते. यादरम्यान बॅटने त्याला चांगली कामगिरी करता आली नव्हती. परंतु, यष्टिमागे त्याने चांगली कामगिरी केली होती.
तसेच १९ सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातून देखील त्याने माघार घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलियाचे तीन खेळाडू, जे आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्यात ठरले अपयशी
तुफानी फटकेबाजी! टी२० विश्वचषकात सर्वात वेगवान अर्धशतक करणारे ५ फलंदाज
समालोचनावेळी कैफ असं काही बोलला, ज्यामुळे सेहवाग म्हणाला, “आता तुझ्यामुळे मार खायची वेळ येऊ शकते”