पुणे। द पूना क्लब लिमिटेड आणि बिलियर्ड्स अँड स्नूकर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र(बीएसएएम) यांच्या संलग्नतेने बीएसएएम सिक्स रेड स्नूकर राज्य निवड अजिंक्यपद 2019 स्पर्धेत शयान राझमी, सुरज राठी, पोरस शहा या मुंबईच्या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करून विजय मिळवला.
पूना क्लब येथील बिलियर्ड्स हॉलमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत डबल एलिमनेशन फेरीत 14 वर्षीय मुंबईच्या शयान राझमी याने आपला शहर सहकारी अभिषेक बजाजचा 4-2(14-46, 47-12, 46-27, 33-25, 33-37, 33-40, 31-18) असा पराभव करून विजयी सलामी दिली. शयान हा कुमार(21वर्षाखालील) गटांतील राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा स्नूकर खेळाडू असून त्याने नुकत्याच मुंबई येथे झालेल्या राज्यस्तरीय स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेत विजेतेपद पटकावले आहे. शयान हा रेडिओ क्लब येथे प्रशिक्षक नेव्हील राझमी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.
अन्य लढतीत पहिल्या सामन्यात मुंबईच्या पोरस शहा याने कॉर्नर पॉकेटच्या चिंतामणी जाधवचा 4-2(01-45, 46-07, 19-30, 23-37, 37-35, 36-10, 41-09) असा तर दुसऱ्या सामन्यात पोरसने पुण्याच्या पिनाक अनपचा 4-2(39-27, 37-04, 35-04, 07-55, 06-41, 30-17) असा पराभव करून दुसरा विजय मिळवला. मुंबईच्या सुरज राठीने तुषार सावदीला 4-2(40-22, 20-40, 07-34, 38-26, 40-13, 41-14) असे पराभूत केले. पुण्याच्या माधव जोशी याने नागपूरच्या चैतन्य दिक्षीतचा 4-0(44-15, 38-07, 49-26, 35-08) असा एकतर्फी पराभव करून पहिला विजय नोंदविला. साद सय्यदने राजवर्धन जोशीला 4-1(23-35, 36-00, 34-22, 64-14, 39-27) असे नमविले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल:
डबल एलिमनेशन फेरी:
संकेत मुथा(पुणे)वि.वि.अश्विन पळणीतकर(पुणे)4-3(08-39, 38-30, 22-33, 30-34, 51-01, 30-13, 39-07);
पिनाक अनप(पुणे)वि.वि.योगेश लोहिया(पुणे)4-0(40-10, 43-14, 48-21, 32-14);
पोरस शहा(मुंबई)वि.वि.चिंतामणी जाधव(कॉर्नर पॉकेट)4-2(01-45, 46-07, 19-30, 23-37, 37-35, 36-10, 41-09);
सुरज राठी(मुंबई)वि.वि.तुषार सावदी 4-2(40-22, 20-40, 07-34, 38-26, 40-13, 41-14);
शयान राझमी(मुंबई)वि.वि.अभिषेक बजाज(मुंबई)4-2(14-46, 47-12, 46-27, 33-25, 33-37, 33-40, 31-18);
पोरस शहा(मुंबई)वि.वि.पिनाक अनप(पुणे)4-2(39-27, 37-04, 35-04, 07-55, 06-41, 30-17);
माधव जोशी(पुणे)वि.वि.चैतन्य दिक्षीत(नागपूर)4-0(44-15, 38-07, 49-26, 35-08);
अमरदीप घोडके(पुणे)वि.वि.सिद्धार्थ टेंबे(पुणे)4-2(21-37, 39-17, 53-06, 10-41, 35-16, 38-19);
साद सय्यद(पुणे)वि.वि.राजवर्धन जोशी(पुणे)4-1(23-35, 36-00, 34-22, 64-14, 39-27);
सिद्धेश मुळ्ये(चिपळूण)वि.वि.निशाद चौगुले(पुणे) 4-2(01-00, 55-07, 05-41, 24-32, 45-04, 35-22)