दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा याने खूप कमी वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वतःचे अस्थित्व तयार केले आहे. वनडे विश्वचषक 2023 भारतात खेळला जात असून स्पर्धेतील 15वा सामना धरमशाला स्टेडियमवर नेदर्लंड्स आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला गेला. कागिसो रबाडा याने या सामन्यात कारकिर्दीतील मोठा पट्टा पार केला.
दक्षिण आफ्रिकेचा 28 वर्षीय वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा (Kagiso Rabada) याने नोव्हेंबर 2014 मध्ये टी-20 फॉरमॅटमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. मागच्या काही वर्षांमध्ये त्याने अनेकदा आपल्या संघासाठी मॅच विनरची भूमिका पार पाडली. मंगळवारी (17 ऑक्टोबर) रबाडाने वनडे क्रिकेटमध्ये 150 विकेट्स पूर्ण केल्या. नेदर्लंड्सविरुद्धच्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. रबाडाने विक्रमजीत सिंग याच्या रुपात दक्षिण आफ्रिकेला सामन्यातील पहिली विकेट मिळवून दिली. वनडे क्रिकेटमध्ये रबाडासाठी 150वी विकेट देखील ठरली. विशेष म्हणजे डावातील आपल्या पहिल्याच चेंडूवर रबाडाने हा विक्रम नावावर केला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रबाडाने नेदर्लंड्सविरुद्ध पहिली विकेट घेताच 488 विकेट्स पूर्ण केल्या. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर आतापर्यंत 60 सामन्यांमध्ये 280 विकेट्स आहेत. तर 56 टी-20 सामन्यांमध्ये त्याने आतापर्यंत 58 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच कारकिर्दीतील 95व्या वनडे सामन्यात त्याने 150 विकेट्सचा टप्पा पार केला. (Kagiso Rabada completes 150 ODI wickets In Match against Netherlands)
उभय संघांची प्लेइंग इलेव्हन –
दक्षिण आफ्रिका – क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), टेम्बा बावुमा (कर्णधार), रासी व्हॅन डर ड्युसेन, एडन मार्करम, हेन्रीच क्लासेन, डेविड मिलर, मार्को यान्सेन, केशव महाराज, लुंगी एन्गिडी, कागिसो रबाडा, गेराल्ड कोएत्झे.
नेदरलँड्स – विक्रमजीत सिंग, मॅक्स ओ’डौड, कॉलिन एकरमन, बास डी लीड, तेजा निदामनुरु, स्कॉट एडवर्ड्स (यष्टीरक्षक/कर्णधार), सीब्रँड एंजेलब्रेच, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, लोगन वॅन बिक, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकेरेन.
महत्वाच्या बातम्या –
भारताविरुद्धच्या सामन्याआधीच बांगलादेश मोठा धक्का, ‘हा’ मॅच विनर खेळाडू होणार सामन्यातून बाहेर?
श्रीलंका क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय! लैंगिक अत्याचाराचे आरोप असणाऱ्या फलंदाजाला दिली खेळण्याची परवानगी