भारताला पहिले विश्वविजेतेपद जिंकून देणारे कर्णधार कपिल देव यांना काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यातून आता ते सावरले आहे. या आजारातून सावरल्यानंतर त्यांना 1983 मधील विश्वचषक विजेत्या भारतीय संघातील खेळाडूंना भेटायची इच्छा आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.
सन 1983 मध्ये भारतीय क्रिकेट संघाला अष्टपैलू कपिल देव यांनी आपल्या नेतृत्वाखाली भारताचा पहिल्यांदा विश्वचषक जिंकवून दिला होता. या विश्वचषकाच्या दृष्टीने कपिल देव यांची कारकीर्द दर्शवणारा एक चित्रपटही सध्या तयार होत आहे.
कपिल देव यांना आला होता हृदयविकाराचा झटका
सुमारे आठवडाभरापूर्वी कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयात अँजिओप्लास्टी झाली होती. त्यानंतर दोन दिवसांनंतर त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली होती.
विश्वविजेत्या भारतीय संघावर येतोय चित्रपट
कपिल देव यांची क्रिकेटमधील यशस्वी कारकीर्द दर्शवणारा एक चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपाटाचे नाव ‘83’ ठेवण्यात आले आहे. बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणबीर सिंग कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे.
चित्रपटाचा उल्लेख करत संघातील खेळाडूंना भेटायची व्यक्त केली इच्छा
अँजिओप्लास्टी झाल्याच्या एक आठवड्यानंतर गुरुवारी (29 ऑक्टोबर) त्यांनी व्हिडीओद्वारे एक संदेश दिला आहे. यामध्ये त्यांनी 1983 च्या विश्वचषक विजेत्या संघातील आपल्या सहकाऱ्यांना शुभेच्छा देत सांगितले की, “आता मी खूपच चांगला आहे आणि संघातील सर्व सहकार्यांना पुन्हा भेटायला उत्सुक आहे. आपण लवकरच भेटण्याचा प्रयत्न करू. चित्रपट लवकरच सिनेमागृहात येणार आहे. वर्षाचा अखेर होतं आहे. मात्र, पुढील वर्षाची सुरुवात चांगली होईल. तुम्ही मला दिलेल्या शुभेच्छेबद्दल धन्यवाद.”
Good to have you back @therealkapildev Paaji .. Best wishes for your movie ✌️ pic.twitter.com/EoBkAoPefT
— Suresh Raina🇮🇳 (@ImRaina) October 29, 2020
कपिल देव यांची कारकीर्द
कपिल देव यांनी 131 कसोटी सामने खेळले आहेत.त्यात त्यांनी 29.65 च्या सरासरीने 434 विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये त्यांनी 5248 धावाही केल्या आहेत. त्यांनी 225 वनडे सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केलं आहे.यामध्ये त्यानी 253 विकेट्स घेतल्या आहेत आणि 3753 धावा केल्या आहेत. 175 ही त्यांची सर्वोत्कृष्ट धावसंख्या होती.
महत्त्वाच्या बातम्या –
-कपिल देव यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज; माजी भारतीय क्रिकेटरने शेअर केला फोटो
‘विराट कोहली तर साक्षात देव!’ सुर्यकुमार यादवचा ४ वर्षांपुर्वीचा ट्विट जोरदार व्हायरल
धोनीने बटलर, पंड्यां बंधुंनंतर कोलकाताच्या दोन खेळाडूंनाही दिली जर्सी भेट, पाहा फोटो
ट्रेंडिंग लेख –
-क्रिकेटमधील खरेखुरे ‘जंटलमॅन’, ‘त्या’ एका कृतीने ‘कपिल देव’ जगभरातील चाहत्यांच्या मनात पोहोचले
-शशी कपूर यांना लॉर्ड्समध्ये प्रवेश मिळण्यासाठी कपिल देव यांनी केली अशी आयडिया…
-वाढदिवस विशेष: १९८३ विश्वचषक विजेते कर्णधार कपिल देव यांच्याबद्दल खास १० गोष्टी