नवी दिल्ली | आयपीएलच्या 13 व्या हंगामातील सामने सुरु होण्यापूर्वीच चेन्नई सुपर किंग्सचा अनुभवी फलंदाज सुरेश रैना युएई सोडून भारतात परतला होता. त्यानंतर मलिंगा, हरभजन सिंग यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूंनीसुद्धा या स्पर्धेत भाग न घेण्याचा निर्णय घेतला. पण आता आणखी एका अनुभवी खेळाडूने अर्धा हंगाम झाल्यावर आयपीएल सोडण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंडचा माजी फलंदाज आणि आयपीएलमधील समालोचक केविन पीटरसनने आयपीएल सोडले आहे.
केविन पीटरसन आयपीएलच्या या हंगामात समालोचन करत होता. त्याने अचानकच आयपीएल सोडण्याचा निर्णय घेतल्यामुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. तो यूएईमधून इंग्लंडला रवाना झाला आहे.
पीटरसनने का सोडले आयपीएल?
केविन पीटरसनने आपल्या मुलांमुळे आयपीएल सोडले आहे. त्याने ट्विट करुन म्हटले आहे की, “आपल्या मुलांबरोबर घरी वेळ घालवायचा आहे, म्हणून मी आयपीएल 2020 मधूनच सोडत आहे. मला संपूर्ण दिवस आपल्या मुलांसमवेत घालवायचा आहे.”
पीटरसनला दोन मुले आहेत आणि प्रसिद्ध गायिका जेसिका टेलर त्यांची पत्नी आहे.
https://twitter.com/KP24/status/1317032927147008000?s=20
https://twitter.com/KP24/status/1316988060236656641?s=20
रायडूवर केली होती टीका
केविन पीटरसनने शेवटच्या सामन्यात (15 ऑक्टोबर) किंग्स इलेव्हन पंजाब आणि रॉयल चॅलेंजर्सविरुद्ध समालोचन केले होते. या सामन्यात पंजाबने डावाच्या शेवटच्या चेंडूवर विजय मिळविला होता. पीटरसनने आयपीएलदरम्यान खेळाच्या अनेक महत्वाच्या बाबींवर लक्ष केंद्रीत केले होते. पीटरसनने चेन्नई सुपर किंग्सचा अनुभवी फलंदाज अंबाती रायडूवर संथ खेळी केल्याबद्दल टीका केली होती. पीटरसन म्हणाला होता की, “रायडूला खेळात बदल करण्याची गरज आहे आणि त्याने दिग्गज फलंदाज डिविलिअर्स, डुप्लेसिस आणि वॉर्नर यासारख्या खेळाडूंकडून शिकण्याची गरज आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
–निवृत्तीचा निर्णय मागे घेतलेला अंबाती रायडू झाला या संघाचा कर्णधार
-तो पहिलाच इंग्लिश मॅन.! आयपीएलमध्ये ‘ही’ कामगिरी फक्त जॉस बटलरने केलीये
–५ संघांकडून आयपीएल खेळलेला केविन पीटरसन म्हणतो, यावेळी जिंकणार ‘हाच’ संघ
ट्रेंडिंग लेख-
-अविश्वसनीय गुणवत्ता असूनही संपूर्ण कारकीर्दीत वादग्रस्त राहिलेला अंबाती रायडू
-चेन्नई सुपर किंग्सला चौथ्यांदा आयपीएल चषक मिळवून देऊ शकतात हे ३ महारथी
-सुरैश रैनाऐवजी यंदा हे ३ खेळाडू बनू शकतात चेन्नई सुपर किंग्सचे उपकर्णधार