fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

खेलो इंडिया: कुस्तीमध्ये महाराष्ट्राला चार कास्यंपदके

पुणे। महाराष्ट्राच्या मल्लांना कुस्तीमधील २१ वषार्खालील गटात केवळ चार कास्यंपदकांवर समाधान मानावे लागले. फ्रीस्टाईल विभागाच्या या स्पर्धेतील ५७ किलो गटात ज्योतिबा अटकाळे याला कास्यंपदक मिळाले. ६५ किलो गटात देवानंद पवार याला कास्यपदकाची कमाई झाली. ९७ किलो गटात विक्रम पारखी याने ब्राँझपदक पटकाविले. ७१ किलो गटात सागर शिंदे यालाही ब्राँझपदक मिळाले.

वेटलिफ्टिंग

मुलांच्या २१ वषार्खालील ८९ किलो गटात निखिल तुगनेट या पंजाबच्या खेळाडूने स्नॅचमध्ये १३४ किलो तर क्लीन व जर्कमध्ये १६० किलो असे एकूण २९४ किलो वजन उचलले. हरयाणाच्या मनीषकुमार याने अनुक्रमे १३० किलो व १५६ किलो असे एकूण २८६ किलो वजन उचलले आणि रौप्यपदक पटकाविले.

१७ वषार्खालील ८९ किलो वजनी गटात तेलंगणाच्या हलावथ कार्तिक याने सुवर्णपदक जिंकले. त्याने स्नॅचमध्ये ११२ किलो तर क्लीन व जर्कमध्ये १४६ किलो असे एकूण २५८ किलो वजन उचलले. भोला सिंह या बिहारच्या खेळाडूने स्नॅचमध्ये ९८ किलो तर क्लीन व जर्कमध्ये १२१ किलो असे एकूण २१९ किलो वजन उचलले. पंजाबच्या गुरकरणसिंग याला ब्राँझपदक मिळाले. त्याने स्नॅचमध्ये ९५ किलो तर क्लीन व जर्कमध्ये ११८ किलो असे एकूण २१३ किलो वजन उचलले.

You might also like