इंडियन प्रीमियर लीग २०२१ मध्ये शनिवारी (१ मे) चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्या दरम्यान सामना खेळला गेला. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात मुंबईने ४ गड्यांनी थरारक विजय मिळवला. तडाखेबंद अर्धशतक ठोकणारा मुंबईचा अष्टपैलू कायरन पोलार्ड सामन्याचा मानकरी ठरला. या सामन्यात त्याने आयपीएल २०२१ मधील सर्वात वेगवान अर्धशतक पूर्ण केले. आपल्या ८७ धावांच्या नाबाद खेळी दरम्यान त्याने ८ गगनचुंबी षटकार ठोकले. त्या षटकारांच्या व्हिडिओची मेजवानी तुम्हाला देणार आहोत.
पोलार्डची मॅचविनिंग खेळी
चांगल्या सुरुवातीनंतर रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव व क्विंटन डी कॉक बाद झाल्यावर संघाचा सर्वात अनुभवी खेळाडू व उपकर्णधार कायरन पोलार्ड पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला. त्याने सुरुवातीपासूनच चेन्नईच्या गोलंदाजांवर आक्रमण केले. त्याने अखेरपर्यंत नाबाद राहत संघाला विजय मिळवून देताना ३४ चेंडूत ६ चौकार व ८ गगनचुंबी षटकारांच्या मदतीने नाबाद ८७ धावांची अफलातून खेळी केली. यादरम्यान त्याने अवघ्या १७ चेंडूत अर्धशतक झळकावून आयपीएल २०२१ मधील सर्वात वेगवान अर्धशतक पूर्ण केले.
https://twitter.com/lodulalit001/status/1388554224540160000
Pollard mania at Delhi – 87*(34) https://t.co/Byk5qQyeK0 # via @ipl
— 🐥 (@CIassyIntrovert) May 1, 2021
मुंबईचा चौथा विजय
या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून चेन्नईला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. फाफ डू प्लेसिसचे सलग चौथे अर्धशतक व मोईन अलीच्या पहिल्या अर्धशतकाच्या जोरावर चेन्नई मोठ्या धावसंख्येकडे आगेकूच करत होती. मात्र, कायरन पोलार्डने एकाच षटकात दोन बळी मिळवत चेन्नईच्या धावगतीला ब्रेक लावला. अखेरीस अंबाती रायुडूने २७ चेंडूत नाबाद ७२ धावा करताना संघाला २१८ पर्यंत मजल मारून दिली.
प्रत्युत्तरात, कर्णधार रोहित शर्मा व क्विंटन डी कॉकने ७१ धावांची सलामी दिली. मात्र तीन फलंदाज लवकर बाद झाल्याने, मुंबईची अवस्था एकवेळ ३ बाद ८१ अशी होती. कायरन पोलार्ड व कृणाल पंड्या यांनी चौथ्या गड्यासाठी ८९ धावा जोडताना मुंबईला सामन्यात आणले. पोलार्डने एक बाजू अखेरपर्यंत लावून धरत अखेरच्या चेंडूवर मुंबईला रोमांचक विजय मिळवून दिला.
महत्त्वाच्या बातम्या –
पोलार्ड पॉवर! धमाकेदार खेळी करत ठोकले आयपीएल २०२१ मधील वेगवान अर्धशतक
रायुडूची भर मैदानात तोडफोड, नक्की झाल काय? पाहा व्हिडिओ
मुंबईविरुद्ध अर्धशतक करताच फाफ डू प्लेसिस ‘असा’ कारनामा करणारा बनला चेन्नईचा पहिलाच फलंदाज