इंग्लंडमध्ये आयोजित होणारी ‘द हंड्रेड’ क्रिकेट लीग २१ जुलैपासून सुरू होत आहे. ही लीग पुरुष व महिला अशा दोन्ही प्रकारात खेळली जाईल. शुक्रवारी (२ जुलै) खेळाडूंची अंतिम निवड प्रक्रिया पार पडेल. सर्व संघ वाइल्ड कार्ड ड्राफ्टच्या माध्यमातून इंग्लंडच्या देशांतर्गत खेळाडूंची निवड करतील. विल रोड्स, सॅम हेन, ब्रेट ऑलिवेरा, सैफ झेब, स्टीव इकनाझी व चार्ली मॉरीस या खेळाडूंवर सर्व संघांची नजर असेल.
इतर खेळाडूंची निवड यापूर्वीच झाली आहे. सर्व फ्रेंचायझींमध्ये पुरुष आणि एक महिला संघ असतील. शुक्रवारी (०२ लीग) झालेला वाईल्ड कार्ड ड्राफ्ट केवळ पुरुष लीगसाठीच घेण्यात आला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आपल्या पुरुष खेळाडूंना या लीगमध्ये खेळण्याची परवानगी दिली नाही.
भारतीय महिला खेळाडू खेळणार लीगमध्ये
बीसीसीआयने आपल्या पुरुष खेळाडूंना या नवीन लीगमध्ये खेळण्याची परवानगी दिली नसली तरी, पाच भारतीय महिला क्रिकेटपटू ही लीग गाजवताना दिसतील. युवा सलामीवीर व टी२० क्रमवारीतील पहिल्या क्रमांकाची फलंदाज शेफाली वर्मा बर्मिंघम फिनिक्स, भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर मॅंचेस्टर ओरिजनल, युवा फलंदाज जेमिमा रॉड्रिग्ज नादर्न सुपरचार्जर्स, अनुभवी स्मृती मंधाना सदर्न ब्रेव्हद तर, अष्टपैलू दीप्ती शर्मा लंडन स्पिरिट्स संघाचे प्रतिनिधित्व करेल.
अशी असेल स्पर्धेची पद्धत
या स्पर्धेत प्रत्येक संघाला आपल्या डावात १०० चेंडू खेळायला मिळतील. एक गोलंदाज एका डावात जास्तीत जास्त २० तर, कमीतकमी पाच चेंडू टाकू शकतो. पॉवरप्ले हा २५ चेंडूंचा असेल. एका षटकासाठी अडीच मिनिटांचा कालावधी दिला जाईल. हा सामना जास्तीत जास्त २ तास ३० मिनिटे या कालावधीत संपवावा लागेल.
महत्त्वाच्या बातम्या-
‘श्रीसंतने दिली होती राहुल द्रविडला शिवी’, टीम इंडियाच्या माजी प्रशिक्षकाचा दावा
महान खेळाडूंची परंपरा असलेल्या श्रीलंका क्रिकेटची दुर्दशा, पत्करलेत वनडे क्रिकेटमधील सर्वाधिक पराभव
इंग्लंडमध्ये मुलगी वामिकासोबत फिरताना दिसली विराटची पत्नी अनुष्का; फोटो होतोय जोरदार व्हायरल