चेन्नईमध्ये गुरुवारी (१८ फेब्रुवारी) पार पडलेल्या आयपीएल २०२१ च्या लिलावात अनेक खेळाडू कोटींच्या घरात गेले. यात भारताच्या प्रथम श्रेणीतील क्रिकेटपटू आणि परदेशी क्रिकेटपटूंचा देखील समावेश होता. या लिलावात आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला, तो दक्षिण आफ्रिका संघाचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस मॉरिस. ख्रिस मॉरिसला आपल्या संघात समाविष्ट करून घेण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोर, मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स या संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. शेवटी राजस्थान रॉयल्स या संघाने तब्बल १६.२५ कोटी रुपयांची बोली लावत त्याला आपल्या संघात समाविष्ट करून घेतले.
१४ कोटींपेक्षा जास्त बोली लावण्यात आलेले क्रिकेटपटू
या लिलावात एकूण ४ खेळाडू असे होते. ज्यांच्यावर १४ कोटींपेक्षा जास्त बोली लावण्यात आली. यात ऑस्ट्रेलियन संघाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल यावर १४.२५ कोटी रुपयांची बोली लावत रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोर संघाने आपल्या संघात समाविष्ट केले. तर झाय रिचर्डसन याला १४ कोटी खर्च करत पंजाब किंग्सने आपल्या संघात स्थान दिले. तसेच कायल जेमिसन याला रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोरने १५ कोटी रुपये खर्च करत आपल्या संघात समाविष्ट करून घेतले.
या लेखात आम्ही दरवर्षी आयपीएल लिलावात सर्वाधिक बोली लावण्यात आलेल्या क्रिकेटपटूंचा आढावा घेतला आहे. चला तर जाणून घेऊया…
आयपीएलच्या प्रत्येक लिलावात सर्वाधिक बोली लावण्यात आलेले क्रिकेटपटू-
आयपीएल २००८ : एमएस धोनी (चेन्नई, ६ कोटी )
आयपीएल २००९ : केविन पीटरसन (बेंगलोर, ७.५५ कोटी) आणि अँड्र्यू फ्लिंटॉफ (चेन्नई, ७.५५ कोटी)
आयपीएल २०१० : कायरन पोलार्ड (मुंबई, ४.८ कोटी) आणि शेन बॉन्ड (कोलकाता, ४.८ कोटी)
आयपीएल २०११ : गौतम गंभीर (कोलकाता, ११. ४ कोटी)
आयपीएल २०१२ : रविंद्र जडेजा (चेन्नई, ९.७२ कोटी)
आयपीएल २०१३ : ग्लेन मॅक्सवेल (मुंबई, ५.३ कोटी)
आयपीएल २०१४: युवराज सिंग (बेंगलोर, १४ कोटी)
आयपीएल २०१५ : युवराज सिंग (दिल्ली, १६ कोटी)
आयपीएल २०१६: शेन वॉटसन (बेंगलोर, ९.५ कोटी)
आयपीएल २०१७ : बेन स्टोक्स (पुणे, १४.५ कोटी)
आयपीएल २०१८ : बेन स्टोक्स (राजस्थान, १२.५ कोटी)
आयपीएल २०१९: जयदेव उनाडकट (राजस्थान, ८.४ कोटी) आणि वरुण चक्रवर्ती (पंजाब, ८.४ कोटी)
आयपीएल २०२०: पॅत कमिन्स (कोलकाता, १५.५ कोटी)
आयपीएल २०२१: ख्रिस मॉरिस (राजस्थान, १६.२५ कोटी)
महत्त्वाच्या बातम्या-
पुणेकरांसाठी वाईट बातमी! भारत-इंग्लंड वनडे सामना पुण्यात नव्हे तर ‘या’ शहरात होणार? वाचा कारण
टेम्पो चालकाचा मुलगा ते नेट बॉलर अन् आता आयपीएल गाजवण्यास सज्ज, पाहा कोण आहे तो?
बॉलिवूडचा ‘किंग खान’च्या नावावर आपले नाव ठेवणारा शाहरुख बनला कोट्याधीश, वाचा त्याची रोमांचक कहाणी