प्रत्येक खेळाडूचे स्वप्नं असते की, लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करावे. अनेकांना हे स्वप्न पूर्ण करण्यात यश येते तर काहींचे हे स्वप्न अपूर्ण राहून जाते. सध्या इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना इंग्लंडच्या लॉर्ड्सच्या मैदानावर सुरू आहे. ऐतिहासिक मैदान असल्यामुळे या मैदानावर होणारी प्रत्येक गोष्ट ही स्पेशल असते. अनेकांना असा ही प्रश्न पडला असेल की, खेळाडू लंच ब्रेकमध्ये काय खात असतील. तुम्हाला ही असा प्रश्न नक्कीच पडला असेल. चला तर मग जाणून घेऊया
क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानाचे सोशल मीडिया अकाऊंट देखील प्रचंड सक्रिय असते. ते सोशल मीडियावर मैदानावर सुरू असलेल्या हालचाली क्रिकेट चाहत्यांपर्यंत पोहचवण्याचे काम करत असतात. नुकताच त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या लंचच्या मेन्यूकार्डचा फोटो शेअर केला आहे.
भारतीय संघासाठी असा होता लंच मेन्यू
भारतीय खेळाडूंसाठी लंच मेन्यूमध्ये ग्रिल्ड चर्मोला चिकन सुप्रीम, भाजलेला भोपळा, बदाम, हिरवा कांदा, डाळिंब आणि कोथिंबीर कुसकुस, कोथिंबीर पेस्टो तसेच सार्डिन सॅल्मन फिलेट, कोळंबी, एका जातीची बडीशेप आणि कॅनेलिनी बीन स्टू यांचा समावेश होता.
तसेच या मेन्यूमध्ये, पनीर टिक्का ग्रीन बीन्स आणि स्टिर-फ्राईड पालक आणि गोड बटाटा, फुलकोबी आणि पालक डाळ धणे पेस्टो.तसेच पुढे बासमती तांदूळ, लसूण आणि रोझमेरी, भाजलेले बटाटे मटार, फ्रेंच बीन्स, शॅलॉट्स, लसूण आणि क्रॅनबेरी या खाद्यपदार्थांचा समावेश होता.लॉर्ड्सच्या मैदानावर खेळाडूंच्या तब्यतीचा देखील विचार केला जातो. भारतीय खाद्यपदार्थ हे मसालेदार असतात. त्यामुळे लंचच्या वेळी भारतीय खेळाडूंना मायदेशातील खाद्यपदार्थ दिले जातात.(Lord’s ground offered all this for team india at lunch on first day)
A look at the Players' Dining Lunch Room menu for Day One 👀
What would your choice be? 🤔#LoveLords | #ENGvIND pic.twitter.com/ftBgN0VGtG
— Lord's Cricket Ground (@HomeOfCricket) August 12, 2021
भारताच्या पहिल्या डावात ३६४ धावा
भारताचा पहिला १२६.१ षटकात ३६४ धावांवर संपुष्टात आला आहे. भारताकडून पहिल्या डावात केएल राहुलने १२९ धावांची शतकी खेळी केली. तर रोहित शर्माने ८३ धावांची शतकी खेळी केली. त्याचबरोबर विराट कोहली (४२), रविंद्र जडेजा (४०) आणि रिषभ पंत (३७) यांनी छोटेखानी, पण महत्त्वपूर्ण खेळी केल्या. इंग्लंडकडून जेम्स अँडरसनने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या, तर ऑली रॉबिन्सन आणि मार्क वूडने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. मोईन अलीला १ विकेट मिळाली.
रुट-बर्न्सने सावरला इंग्लंडचा डाव
भारताचा पहिला डाव संपल्यानंतर इंग्लंड संघ फलंदाजीला उतरला. इंग्लंडची सुरुवात खराब झाली. १५ व्या षटकात मोहम्मद सिराजने सलग २ चेंडूत डॉमनिक सिब्ली आणि हसीब हमीद यांना बाद केले. मात्र, यानंतर कर्णधार जो रुट आणि सलामीवीर रॉरी बर्न्स यांनी इंग्लंडचा डाव सावरला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ८५ धावांची भागीदारी केली.
मात्र, दुसऱ्या दिवसाचा खेळ संपण्यास काही वेळ बाकी असताना मोहम्मद शमीने बर्न्सला ४९ धावांवर बाद केले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडने ४५ षटकांत ३ बाद ११९ धावा केल्या आहेत, दुसऱ्या दिवसाखेर रुट ४८ धावांवर आणि बेअरस्टो ६ धावांवर नाबाद आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
पंतचं ऐकलं असतं तर, विराटच्या नावे ‘हा’ नकोसा विक्रम झाला नसता
कर्णधार किंग कोहलीला बाद करण्याच्या ‘मास्टर प्लॅन’बद्दल स्वतः गोलंदाजाने केला खुलासा
लॉर्ड्स कसोटीत १४ धावा करताच रूटची ‘मोठ्या’ विक्रमाला गवसणी, आता केवळ कूक आहे पुढे