सध्या टेनिस विश्वातील तिसरी ग्रँडस्लॅम म्हणजेच विंबल्डन स्पर्धा लंडन येथे खेळली जात आहे. रविवारी (16 जुलै) स्पर्धेचा पुरुष एकेरीचा अंतिम सामना खेळला जाईल. अग्रमानांकित स्पेनचा कार्लोस अल्कारेझ विरुद्ध सर्बियाचा नोव्हाक जोकोविच यांच्या दरम्यान हा सामना खेळला जाईल. तत्पूर्वी, विंबल्डनच्या सोशल मीडिया हँडलवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील काही तरुणांनी, आपल्या शेतात विंबल्डनचा लोगो तयार केल्याचे दिसते.
लातूर जिल्ह्यातील हरहुन्नरी कलाकार मंगेश निपाणीकर यांनी निलंगा येथील महाराष्ट्र कॉलेज ऑफ इंजिनिअरींग येथे साकारलेल्या विंबल्डन टेनिस स्पर्धेच्या ‘हरित लोगो’ची दखल आयोजकांनी घेतली आहे. जवळपास दोन आठवड्यांच्या मेहनतीनंतर 100,000 स्क्वेअर फुट जागेवर ही प्रतिकृती तयार केली असून, सर्व स्तरातून त्यांच्या या मेहनतीचे कौतुक केले जात आहे.
For two weeks, grass artists in Maharashtra worked on a field of 100,000 sq.ft to create the biggest Wimbledon logo 🤩 #AlwaysLikeNeverBefore #Wimbledon pic.twitter.com/7Vetd09hnm
— Wimbledon (@Wimbledon) July 14, 2023
निपाणीकर यांनी गवतावर साकारलेल्या या प्रतिकृतीसाठी त्यांच्या विद्यार्थ्यांनी देखील मेहनत घेतल्याचे सांगितले. या, व्हिडिओमध्ये मुले हाताने खड्डे घेत तसेच ट्रॅक्टरने जमीन समतल करत असल्याचे दिसत आहे. तसेच योग्य जागी रंग भरण्याचे काम देखील या सर्वांनी केले.
(Maharashtra Grass Artist Replicates Wimbledon Logo In 100,000 Sq Ft)
महत्वाच्या बातम्या –
‘अनारकली’चा उल्लेख करून रोहितने स्वत:च्या पायावर मारली कुऱ्हाड, पत्नी रितिकाने खोलली पोल; कमेंट व्हायरल
खूपच कमी वयात आफ्रिदीची कसोटीत मोठी कामगिरी, श्रीलंकेच्या सलामीवीराची विकेट घेताच रचला विक्रम; पाहा व्हिडिओ