मुंबई: महाराष्ट्रच्या युवा खेळाडूंनी विजयवाडा येथे झालेल्या इलेव्हन स्पोर्ट्स राष्ट्रीय रँकिंग अजिंक्यपद स्पर्धेत (दक्षिण विभाग) शेवटच्या दिवशी एक सुवर्णपदक व दोन कांस्यपदकाची नोंद करत चमक दाखवली.
श्रुती अमृतेने युथ मुलींच्या गटात सुवर्णपदक तर, सिद्धेश पांडे व श्रुष्टी हालेंगडीने कांस्यपदक मिळवले.त्यामुळे गुणतालिकेत राज्यातील खेळाडूंनी तब्बल तीन सुवर्णपदक, एक रौप्य व पाच कांस्यपदकाची कमाई केली.
श्रुतीने चुरशीच्या लढतीत मनुश्री पाटीलवर 3-2 अशा फरकाने विजय मिळवला. उपांत्यपूर्व सामन्यात तिने तामिळनाडूच्या कौशिक वेंकटसानवर विजय मिळवला.तिने उपांत्यफेरीत सेलेना सेलवाकुमारला 4-3 असे नमविले. अंतिम सामन्यात श्रीजा अकुला चा पराभव करत सुवर्णपदक आपल्या नावे केले.
श्रुष्टीला याच गटात उपांत्यफेरीत अकुलाकडून 0-4 असे पराभूत व्हावे लागले.मुलांच्या युथ गटात महाराष्ट्रच्या सिद्धेश पांडेला पार्थ विरमनीकडून पराभूत व्हावे लागले व कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.