कोरोना व्हायरसमुळे जगभरातील सर्व क्रिकेटच्या स्पर्धा एकतर स्थगित किंवा पुढे ढकलल्या आहेत. याचमुळे आयपीएल सुरु होणार की नाही याबद्दलही प्रश्न उपस्थित केले जात आहे.
आयपीएल २०२० स्पर्धा १४ एप्रिलपर्यंत बीसीसीआयने स्थगित केली आहे. परंतु देशात २१ दिवसांचे लाॅकडाऊन असल्याने ही स्पर्धा सुरु होणे जवळपास कठीण दिसत आहे.
यामुळे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांची १४ एप्रिल रोजी एक अंतिम बैठक होणार आहे. कोरोना व्हायरसने देशातील परिस्थिती भयंकर झाली आहे. यामुळे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्च रोजी २१ दिवसांच्या लाॅकडाऊनची घोषणा केली होती.
भारतातील नागरिकांना सरकारने घरीच राहण्याचे आव्हान केले आहे. लाॅकडाऊन १४ एप्रिल रोजीच संपणार आहे. त्यामुळे त्याच दिवशी स्पर्धा सुरु करणे जवळपास अशक्यच आहे.
एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले आहे की, आम्ही शेवटची बैठक मुंबईतील मुख्यालयात केली होती. त्यानंतरची बैठक मात्र रद्द झाली. यामुळे सरकार कोरोना व्हायरसमुळे सरकार काय निर्णय घेतंय हे आम्हाला पहावं लागेल.
२१ दिवसांच लाॅकडाऊन जेव्हा संपेल तेव्हा यावरील परिस्थिती पुर्णपणे समजेल. जेव्हा ही परिस्थिती स्पष्ट होईल तेव्हा पुढील गोष्टींवर चर्चा करता येईल.
गोष्ट एका क्रिकेटरची लेखमालेतील वाचनीय लेख-
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १२: कारखान्यात काम करायला झाम्बियाला निघालेला मुनाफ पटेल
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ११: लांब केसांमुळे संघात प्रवेश नाकारलेला मुरली विजय
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ९: म्हैसुर एक्सप्रेस जवागल श्रीनाथ
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ८: मिस्टर आयपीएल सुरेश रैना
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ७: अहमदनगरचा मराठमोळा झहीर खान
– गोष्ट एका क्रिकेटरची भाग ६: व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ५: मोठ्या भावाच्या जागी स्थान मिळालेला तो पुढे सर्वांचा दादा झाला
–एका क्रिकेटटरची गोष्ट भाग ४: ट्रक ड्राईव्हर बनण्यासाठी कॅनडाला निघालेला हरभजन सिंग
-गोष्ट एका क्रिकेटरची भाग ३: त्रिशतकाची भविष्यवाणी पदार्पणाआधीच करणारा विरेंद्र सेहवाग!
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग २: ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान संघाशी वैर घेणारा इरफान पठाण