टेनिस क्रिकेटमधील प्रसिद्ध समालोचक मनोज बेल्हेकर रविवारी महा स्पोर्ट्सच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधणार आहेत. ते रविवार, दि. १७ मे रोजी सायंकाळी ६ वाजता लाईव्ह येणार आहेत.
यावेळी ते टेनिस क्रिकेट विश्वातील समालोचक, क्रिकेटपटू, या क्षेत्रातील आर्थिक गणितं, समालोचक होण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी, टेनिस क्रिकेटमधील ड्रीम ११ संघ तसेच विविध लोकप्रिय क्रिकेट स्पर्धांबद्दल बोलणार आहेत.
बेल्हेकर गेली अनेक वर्ष क्रिकेटच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील एक लोकप्रिय चेहरा आहेत. तसेच ग्रामीण भागातील एक उत्कृष्ठ समालोचक म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते.
समालोचन करताना शेरोशायरी, छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या काळातले किस्से क्रिकेटच्या समालोचनात बेल्हेकर अगदी चपखल बसवतात.
मनोज बेल्हेकरांपुर्वी महा स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रसिद्ध समालोचक नरेश ढोमे व दिपक मंडले यांनीही चाहत्यांना मार्गदर्शन केले आहे.
आजचा लाईव्ह सेशन-
फेसबुक पेज- महा स्पोर्ट्स ( fb.com/MahaSports )
प्रमुख पाहुणे- टेनिस क्रिकेट समालोचक मनोज बेल्हेकर
वेळ- सायंकाळी ६ वाजता