बर्मिंघम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी भारताच्या वेटलिफ्टर्सनी यशाचा रथ सुसाट ठेवला आहे. संकेत सरगरचे रौप्य व गुरुराज पुजारी याच्या कांस्यपदकानंतर, ऑलिंपिक पदक विजेती महिला वेटलिफ्टर मीराबाई चानूने भारताला या राष्ट्रकुल स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक मिळवून दिले.
𝙂𝙊𝙇𝘿 𝙛𝙤𝙧 𝙈𝙞𝙧𝙖𝙗𝙖𝙞 𝘾𝙝𝙖𝙣𝙪 🥇🇮🇳#TeamIndia's first gold at the @birminghamcg22 Commonwealth Games comes in the women's 49kg weightlifting👏🎇#EkIndiaTeamIndia | #B2022 pic.twitter.com/NYy2hiyWph
— Team India (@WeAreTeamIndia) July 30, 2022
स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी वेटलिफ्टींग प्रकारातील स्पर्धा पार पडल्या. पुरुष गटात संकेत सरगर व गुरूराज पुजारी यांच्या यशानंतर सर्वांच्या नजरा भारताची अव्वल महिला वेटलिफ्टर मीराबाई चानू हिच्यावर होत्या. मागील वर्षी टोकियो ऑलिंपिकमध्ये कांस्यपदक जिंकलेल्या मीराबाईने देशवासियांच्या या अपेक्षा पूर्ण केल्या.
महिलांच्या ४९ किलो वजनी गटात चानूने स्नॅचमध्ये ८८ किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये ११३ किलो वजन उचलून सुवर्ण पटकावले. सोबतच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील विक्रमही केला. टोकियो ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या भारताच्या या स्टार वेटलिफ्टरने स्नॅचमध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत विक्रम केला. तीने क्लीन अँड जर्कमध्ये पहिल्या प्रयत्नात १०९ व दुसऱ्या प्रयत्नात ११३ किलो वजन उचलले.
अखेरच्या प्रयत्नात ती यशस्वी ठरवू शकली नाही. मात्र, याचा भारताच्या सुवर्णपदकावर काहीही परिणाम झाला नाही.
मिराबाई पूर्वी दिवसातील आणि स्पर्धेतील भारताचे पहिले पदक सांगलीच्या संकेत सरगर यांनी मिळवून दिले. त्याने ५५ किलो वजनी गटात रौप्य पदकाची कमाई केली होती. त्यानंतर गुरुराज पुजारी याने ६१ किलो वजने गटात कांस्यपदक आपल्या नावे केले. भारताचे तिन्ही पदके ही एकाच खेळात आली आहेत. सोबतच भारताच्या टेबल टेनिस संघाने देखील शानदार कामगिरी करत पुढील फेरीत जागा बनवली.
महत्त्वाच्या बातम्या-
आनंदाची बातमी! क्रिकेटच्या मैदानात पुन्हा होणार ‘दादागिरी’, कसं ते घ्या जाणून
CWG 2022: टपरी चालवणाऱ्या बापाचे कष्ट फळले! २१व्या वर्षी मुलाने भारताला मिळवून दिलं पदक
‘द्रविडच्या विचारांचा संघाला फायदा नाही’, महत्त्वाच्या खेळाडूला बाहेर ठेवल्यामुळे भडकला माजी दिग्गज