इंग्लडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीने त्याला ‘ओसामा’ अशी हाक मारून त्याचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. त्याच्या या आरोपाने क्रिकेट जगतात खळबळ माजली आहे. 2015 च्या अॅशेस मालिकेदरम्यान हा प्रकार घडल्याचे त्याने सांगितले. कुख्यात आतंकवादी ‘ओसामा बिन लादेन’ असे संबोधल्यामुळे राग अनावर झाल्याचे मोईन अलीने सांगितले.
कार्डिफ येथे झालेल्या पहील्या कसोटी सामन्यात मोईन अली ने 77 धावा आणि 5 बळी मिळवून अष्टपैलू कामगिरी केली. या सामन्यात इंग्लडने ऑस्ट्रेलियाचा 169 धावांनी पराभव केला होता.
31 वर्षीय मोईन अलीने आपल्या आत्मचरित्राचा काही भाग हा द टाइम्स या नियतकालीकात प्रसिद्ध केला आहे.
अॅशेस मालिकेत चांगली कामगिरी करुन देखील आपण विचलित झाल्याचे मोईने त्यात म्हटले आहे. मोईन म्हणाला “की माझी कामगिरी उत्तम होऊन सुद्धा मी आनंदी न्हवतो, झाल्या प्रकारामुळे मला अतिशय संताप आला होता”.
मी माझ्या सहकारी खेळाडू आणि प्रशिक्षक ट्रेवर बेलीस यांना याची माहीती दिली होती. त्यांनी ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक डॅरेन लेहमन यांच्याकडे विचारपूस केली असता आपण असे बोललो नाही असे त्या खेळाडूने सांगितले.
अलीने एका मुलाखती दरम्यान असे सांगितले की ऑस्ट्रेलिया हा एकमेव असा संघ आहे ज्यांनी मला अपमानास्पद अशी वागणूक दिली. झालेल्या आरोपांची दखल घेत याबाबत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच इसीबी सोबत चर्चा झाल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या प्रवक्त्यांनी सांगितले. असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत असे त्यांनी पुढे बोलताना सांगितले.
2015 च्या अॅशेस मालिकेचे यजमानपद इंग्लंड संघाकडे होते आणि त्यांनी मालिका 3-2 अशी जिंकूली होती.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–Video: शोएब मलिक आणि एमएस धोनी यांच्या सरावादरम्यान रंगल्या गप्पा
–सॅफचे आठवे विजेतेपद जिंकण्यास भारतीय संघ सज्ज
–एशिया कप २०१८ स्पर्धेबद्दल सर्वकाही