मुंबई। जे के टायर डब्ल्युआयएए वार्षिक रॅली टु व्हॅलीमध्ये 400 हुन अधिक महिलांसह 100 हुन अधिक कार्सचा सहभाग होता. रविवारी महिला दिन या रॅलीच्या माध्यमातून वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. मुंबई मोटरस्पोर्ट्स कॅलेंडर मधील ही महत्वाची टीएसडी रॅली असून आपल्या सहाव्या वर्षात आहे. हे रॅली म्हणजे महिला सशक्तीकरणाचे चांगले उदाहरण आहे.
लोकप्रिय अभिनेत्री पारिझाद झोराबियन हिने रॅलीचे फ्लॅग ऑफ केले. तिच्यासोबत डब्ल्युआयएएचे कार्यकारी अध्यक्ष नितीन डोसा आणि जे के मोटरस्पोर्ट्सचे हेड ऑफ ऑपरेशन न्स हरी सिंग उपस्थित होते. ही रॅली शहरातील रस्त्यावरून सुरू होऊन लोणावळाच्या एम्बे व्हॅली येथे संपली.
दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील महिलांनी आपल्या कार वेगवेगळ्या थिम्सचा वापर करत सजवल्या. त्यामुळे एनसीपीए चांगले वातावरण तयार झाले. यामध्ये ऍसिड अटॅक सर्व्हायवर, फाईट अगेंस्ट चाईल्ड मॅरेज आणि ब्लिड विथ डीग्निटी सारख्या थिम्सचा समावेश होता.
काही जणांनी एलजीबीटीक्यू फ्रीडम असलेली थिम ठेवली. तर अनेक जणांनी टी 20 महिला विश्वचषकचा अंतिम सामना खेळत असलेल्या भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र पोलिसांकडून देखील दोन कार सहभागी झाल्या होत्या. या दोन कारमध्ये चार महिला पूर्ण गणवेशात उपस्थित होत्या. त्यांनी रस्ते सुरक्षा आणि महिला सशक्तीकरणाचा संदेश दिला.
वैयक्तिक स्तरावर देखील अनेकांनी प्रभावित केले.79 वर्षीय महिला आपल्या दोन नातींना नेव्हीगेटर म्हणून घेऊन आल्या होत्या. मी 62 वर्षे गाडी चालवत असून मी उत्साहित आहे असे राजकुमारी कासलीवाल म्हणाल्या.टीएसडी रॅलीत मला फक्त गती कमी करण्याबाबत अडचण असते. असे त्यांनी पुढे सांगितले.
पॅट ब्रेथवेटच्या रुपात परदेशी नागरिकाने देखील सहभाग नोंदवला. मॉर्गन थ्री व्हीलरचा 3500 मिल (5600 किमी) असा देशभर गुंज या सेवाभावी संस्थेसाठी त्यांनी भारतभर प्रवास या रॅलीसाठी ते वेळेवर उपस्थित होते. ब्रेथवेट यांचे संपूर्ण भारत फिरण्याचे स्वप्न पूर्ण झाल्याने त्या आनंदी होत्या.
मी स्वप्न पूर्ण केल्याने उत्साहित आहे. मला येथील रस्त्यांची कल्पना नव्हती पण माझ्या चमूच्या मदतीने हा प्रवास शक्य झाला आणि विशेष म्हणजे या रॅलीत सहभागी होण्यासाठी मी वेळेत पोहोचले आणि आंतरराष्ट्रीय महिला दिन वेगळ्या पद्धतीने साजरा केला असे त्या म्हणाल्या.
समाजात महिला सशक्तीकरण आणि रस्ते सुरक्षाबाबत जनजागृती निर्माण करणे हे या रॅलीचे मुख्य उद्देश आहे. असे वेस्टर्न इंडिया अॅटोमोबाईल असोसिएशन (डब्ल्युआयएए) चे कार्यकारी अध्यक्ष नितीन डोसा म्हणाले.जे के टायरच्या माध्यमातून मोटरस्पोर्ट्समध्ये महिला पुन्हा येण्यास मदत झाली.
यासोबत त्यांनी राष्ट्रीय रेसिंग चॅम्पियनशिपमध्ये महिला रेसिंग टीम तयार केली. यासोबत कंपनीने वायएलएफओ पॉवर ड्राईव्ह आणि महिला रॅली टू व्हॅली या उपक्रमाच्या माध्यमातून महिला मोटरस्पोर्ट्सला पाठिंबा दिला. यासोबत जे के टायर यांनी सुरक्षा दलासोबत एकत्र येऊन गेल्या वर्षी जे के टायर डिफेन्स वाईव्स पॉवर ड्राईव्हचे आयोजन केले.
रॅली टू व्हॅलीसोबत असल्याचा आम्हाला अभिमान आहे. असे जे के टायरचे मोटरस्पोर्ट्स प्रमुख संजय शर्मा म्हणाले. महिलांचे सशक्तीकरण आणि रस्ते सुरक्षेला प्रोत्साहन हा आमचा या मागचा उद्देश आहे.
या रॅलीमध्ये अनेक महिला सहभागी होत असल्याने आम्हाला आनंद आहे असे ते पुढे म्हणाले. स्पर्धकांमध्ये आई-मुलीसोबत, मित्र आणि कुटुंब हे आपल्या सजवलेल्या कारसोबत उपस्थित होते. संपुर्ण रॅलीमध्ये अडथळा येऊ नये यासाठी संपुर्ण मार्गावर स्वयंसेवक उपस्थित होते.