पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कराची येथे झालेल्या दुसरा कसोटी सामना पाचव्या दिवशी अनिर्णित राहिला. या सामन्यात पाकिस्तानी कर्णधार बाबर आझम फलंदाजी करत होता, तेव्हा पाकिस्तान संघ ५०६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत सामना जिंकेल, असे वाटले होते. मात्र, अनिर्णित राहिला.
या सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करण्याचा विक्रम झाला नाही. मात्र, आणखी एक ऐतिहासिक विक्रम नोंदवला गेला. पाकिस्तानने (PAK vs AUS) चौथ्या डावात एकूण १०३० चेंडू खेळले. ८३ वर्षांनंतर कसोटीच्या चौथ्या डावात १००० पेक्षा जास्त चेंडू खेळून पाकिस्तान सामना वाचवणारा पहिला संघ ठरला आहे. क्रिकेट इतिहासात असे घडण्याची ही दुसरी वेळ आहे, जेव्हा एखाद्या संघाने कसोटीच्या चौथ्या डावात १००० किंवा त्याहून अधिक चेंडू खेळून सामना वाचवला आहे.
सन १९३९ मध्ये इंग्लंडने पहिल्यांदा ही कामगिरी केली होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीच्या चौथ्या डावात १७४६ चेंडू खेळून ५ बाद ६५४ धावा केल्या होत्या.. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत इंग्लंड आणि पाकिस्तान व्यतिरिक्त कोणत्याच संघाने चौथ्या डावात सामना वाचवण्यासाठी १००० चेंडूहून अधिक चेंडू खेळलेले नाहीत.
या दोन संघांनंतर तिसरा क्रमांकही इंग्लंडचाच आहे, ज्याने १९९५ मध्ये कसोटीच्या चौथ्या डावात ९९० चेंडू खेळले होते. ही कसोटीही दक्षिण आफ्रिकेविरुद्धच झाली होती. चौथा क्रमांक वेस्ट इंडिज संघाचा आहे, ज्याने १९३० मध्ये इंग्लंडविरुद्ध चौथ्या डावात ९८७ चेंडू खेळून सामना वाचवला होता.
कराची कसोटीत ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. संघाने पहिल्या डावात ९ बाद ५५६ धावा करून डाव घोषित केला. यानंतर पाकिस्तानचा संघ पहिल्या डावात १४८ धावांवर सर्वबाद झाला. लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने २ बाद ९७ धावा करून डाव घोषित केला आणि ५०६ धावांचे लक्ष्य ठेवले. त्यानंतर पाकिस्तानने २१ धावांवर दोन विकेट गमावल्या, परंतु कर्णधार बाबर आझम आणि अब्दुल्ला शफीक यांनी ५२४ चेंडू खेळत २२८ धावांची भागीदारी केली.
महत्त्वाच्या बातम्या-
‘असं असतं भावा’, रिषभ पंतने ‘खाबी’ बनत उडवली अक्षर पटेलची खिल्ली, पाहून तुम्हीही व्हाल लोटपोट
एकटी मुंबई इंडियन्स होम ग्राउंडवर खेळणार आयपीएल सामने, पण याचा त्यांना फायदा होणार? वाचा
‘तुम्हाला माझी परिस्थिती माहिती नाही’, यो-यो टेस्टमध्ये नापास झाल्यानंतर पृथ्वी शॉ भावूक