आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिनच्या नावावर अनेक विक्रम आहेत. सचिनप्रमाणेच ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, पाकिस्तान किंवा श्रीलंकेच्या खेळाडूंच्या नावावरही अनेक विक्रम आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये विक्रम करणे ही एक मोठी गोष्ट समजली जाते.
त्यात अनेक खेळाडूंच्या नावावर अनेक विक्रम आहेत. १० हजार चेंडू खेळणे ही त्यातील एक मोठी गोष्ट समजली जाते. कसोटी क्रिकेटमध्ये केवळ ७५ खेळाडूंना कसोटीत १० हजार किंवा त्यापेक्षा जास्त चेंडूंचा सामना करता आला आहे. तर भारतीय क्रिकेटपटूंमध्ये ९ फलंदाजांना हा कारनामा करता आला आहे.
कसोटीत सर्वाधिक चेंडू खेळण्याचा पराक्रम राहुल द्रविडच्या नावावर आहे. द्रविडने तब्बल ३११८४ चेंडू कसोटी कारकिर्दीत खेळले आहेत. जगातील अन्य कोणत्याही खेळाडूला ३० हजार किंवा त्यापेक्षा जास्त चेंडू खेळता आलेले नाहीत.
भारताकडून १० हजार किंवा त्यापेक्षा अधिक चेंडू खेळणारे फलंदाज
३११८४- राहुल द्रविड, सामने-१६४
२९४३७- सचिन तेंडूलकर, सामने- २००
१७७८५- व्हीव्हीएस लक्ष्मण, सामने- १३४
१५३२७- सुनिल गावसकर, सामने- १२५
१४०७०- सौरव गांगुली, सामने- ११३
१२६४४- चेतेश्वर पुजारा, सामने- ६१
१२५५२- विराट कोहली, सामने- ८६
११४५०- दिलीप वेंगसकर, सामने- ११६
१०४४१- विरेंद्र सेहवाग, सामने- १०४
ट्रेंडिंग घडामोडी-
-ज्या क्रमांकाची जर्सी घातलो, तेवढेच लाख रोहितने दिले पंतप्रधान सहाय्यता निधीला
-लाॅकडाऊनमध्येही या खेळाडूंना जायचं आहे घराबाहेर, हे आहे कारण
-डेविड वाॅर्नरने या कारणामुळे केला टक्कल, चाहत्यांनी केले कौतूक