---Advertisement---

भारताकडून वनडे पदार्पणातचं दणक्यात सुरुवात करणारे ५ फलंदाज

---Advertisement---

क्रिकेटमध्ये खेळाडू तसे पाहिले तर चारवेळा पदार्पण करतो. कसोटी, वनडे व टी२० पदार्पण असे खरे तर तीन प्रकार. परंतु खेळाडू जेव्हा या तीनही प्रकारातील कोणताही सामना पहिल्यांदा खेळतो तेव्हा त्याला आंतरराष्ट्रीय पदार्पण असे म्हटले जाते.

प्रत्येक खेळाडूला आपले आंतरराष्ट्रीय किंवा कोणतेही पदार्पण कायम लक्षात राहिल असे व्हावे वाटते. पदार्पण फारच वेळा कधी होईल, हे खेळाडूच्या हातात असते. तेव्हाची परिस्थिती, संघात कुणी जखमी झाले आहे का किंवा अन्य कारणामुळे खेळाडूंचे पदार्पण होतं असते. Most runs on debut in ODIs Cricket for India.

फारच थोड्या खेळाडूंना आपल्या पदार्पणाच्या सामन्यात चांगली कामगिरी करता येते. काही खेळाडूंनी पदार्पण चांगले केल्यावर पुढे कारकिर्द तेवढी चांगली घडत नाही किंवा चांगले पदार्पण झाले नाही तरीही कारकिर्द चांगली होते असेही बऱ्याच वेळा चाहत्यांनी पाहिले आहे.

या लेखात भारताकडून वनडेत जंगी पदार्पण करणाऱ्या फलंदाजांची माहिती घेणार आहोत.

५. मनीष पांडे (७१ धावा)

१४ जुलै २०१५ रोजी कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वाखाली मनीष पांडेने वयाच्या २४व्या वर्षी हरारे झिंब्बाब्वे येथे वनडे पदार्पण केले. पहिल्याच सामन्यात त्याला ५व्या स्थानावर फलंदाजीची संधी मिळाली. या मालिकेत भारतीय संघातील अनेक खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे युवा खेळाडूंना घेऊन संघ या दौऱ्यावर गेला होता. पांडेने ८६ चेंडूत ७१ धावांची खेळी करताना ५व्या विकेटसाठी १४४ धावांची भागीदारी केली होती. भारताने हा सामना ८३ धावांनी जिंकला होता.

४. नवज्योत सिंग सिद्धू (७३ धावा)

कसोटी पदार्पणानंतर तब्बल ४ वर्षांनी सिद्धूला वनडे सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. १९८७मध्ये वयाच्या २४व्या वर्षी चेन्नई येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने वनडे पदार्पण केले. यात त्याने कर्णधार कपिल देवच्या नेतृत्त्त्वाखाली ७९ चेंडूत ७३ धावांची शानदार खेळी दुसऱ्या डावात केली. तो या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. ऑस्ट्रेलियाने जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावर हा सामना १ धावेने जिंकला होता.

३. ब्रिजेश पटेल (८२ धावा)

१९७४साली भारताकडून इंग्लंडविरुद्ध लीड्स वनडेत ब्रिजेश पटेल यांनी वनडे पदार्पण केले. त्यांनी या सामन्यात प्रथम फलंदाजी करत असलेल्या भारताकडून ७८ चेंडूत ८२ धावांची खेळी केली. भारताकडून पदार्पणात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर पुढे २००६पर्यंत राहिला. १० वनडे सामने खेळलेल्या पटेल यांच्या वनडे कारकिर्दीतील हीच सर्वोत्तम धावसंख्या राहिली. हा सामना इंग्लंडने ४ विकेट्सने पुढे जिंकला.

२. राॅबीन उथप्पा (८६ धावा)

इंदोर वनडे १५ एप्रिल २००६ रोजी राॅबीन उथप्पाने कर्णधार राहुल द्रविडच्या नेतृत्त्वाखाली इंग्लंडविरुद्ध पदार्पण केले. दुसऱ्या डावात भारतीय संघ फलंदाजी करत असताना उथप्पाने सलामीला येत ८६ धावांची शानदार खेळी केली. त्याला पदार्पणात वनडेत शतक कऱणारा पहिला खेळाडू होण्याची संधी होती. परंतु तो या सामन्यात धावबाद झाला. भारताने हा सामना ७ विकेट्सने जिंकला होता.

१. केएल राहुल (नाबाद १०० धावा)

भारताकडून वनडे पदार्पणात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केएल राहुलच्या नावावर आहे. राहुलने हरारे येथे झिंब्बाब्वे विरुद्ध वनडे पदार्पणात दुसऱ्या डावात सलामीला येत नाबाद १०० धावांची खेळी केली. याच सामन्यात युझवेंद्र चहल व करुन नायर या खेळाडूंनी वनडे पदार्पण केले होते. याच सामन्यात केएल राहुलला सामनावीर पुरस्कार देण्यात आला होता.

गोष्ट एका क्रिकेटरची लेखमालेतील वाचनीय लेख-

गोष्ट एका क्रिकेटरची भाग १७: धोनी आधी पदार्पण करुनही १४ वर्षांचा वनवास पाहिलेला दिनेश कार्तिक

गोष्ट एका क्रिकेटरची भाग १६: राजेशाही घराण्यातूनच क्रिकेटचा वारसा घेऊन आलेला अजय जडेजा

गोष्ट एका क्रिकेटरची भाग १५: शंभर कसोटी सामन्यांच्या उंबरठ्यावर असणारा इशांत शर्मा

गोष्ट एका क्रिकेटरची भाग १४: भारताचा जंबो गोलंदाज अनिल कुंबळे

गोष्ट एका क्रिकेटरची भाग १३: तब्बल १८ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा आशिष नेहरा

गोष्ट एका क्रिकेटरची भाग १२: कारखान्यात काम करायला झाम्बियाला निघालेला मुनाफ पटेल

गोष्ट एका क्रिकेटरची भाग ११: लांब केसांमुळे संघात प्रवेश नाकारलेला मुरली विजय

गोष्ट एका क्रिकेटरची भाग १०: भारताचा भन्नाट क्षेत्ररक्षक मोहम्मद कैफ

गोष्ट एका क्रिकेटरची भाग ९: म्हैसुर एक्सप्रेस जवागल श्रीनाथ

गोष्ट एका क्रिकेटरची भाग ८: मिस्टर आयपीएल सुरेश रैना

गोष्ट एका क्रिकेटरची भाग ७: अहमदनगरचा मराठमोळा झहीर खान

 गोष्ट एका क्रिकेटरची भाग ६: व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण

गोष्ट एका क्रिकेटरची भाग ५: मोठ्या भावाच्या जागी स्थान मिळालेला तो पुढे सर्वांचा दादा झाला

एका क्रिकेटटरची गोष्ट भाग ४: ट्रक ड्राईव्हर बनण्यासाठी कॅनडाला निघालेला हरभजन सिंग

-गोष्ट एका क्रिकेटरची भाग ३: त्रिशतकाची भविष्यवाणी पदार्पणाआधीच करणारा विरेंद्र सेहवाग!

गोष्ट एका क्रिकेटरची भाग २: ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान संघाशी वैर घेणारा इरफान पठाण

गोष्ट एका क्रिकेटरची भाग १: तेव्हा ऑनर बोर्डवर नाव न लागलेल्या द्रविडने भारतीयांच्या मनात मात्र तो ऑनर मिळवलाच

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---