आपला पहिलाच सामना यादगार रहावा अशी प्रत्येक खेळाडूंची मनोमन इच्छा असते. कसोटी, वनडे किंवा टी२०त पहिल्याच सामन्यात धडाकेबाज कामगिरी करुन जगाचं लक्ष वेधून घेण्याची खेळाडूंची इच्छा असते. चांगली सुरुवात हे क्रिकेटप्रेमी कधीच विसरत नाही.
म्हणूनच पदार्पणाच्या सामन्यात अनन्यसाधारण महत्त्व असते. आजपर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये ३०१३ खेळाडूंनी वेगवेगळ्या १३ संघांकडून क्रिकेट खेळले. यातील केवळ ५ खेळाडूंनी वनडे पदार्पणात द्विशतक केले आहे तर पहिल्याच सामन्यात शतकी खेळी करण्याचा कारनामा १०६ खेळाडूंनी केला आहे. Most runs on debut in Test Cricket.
दोन खेळाडू असेही आहेत ज्यांनी पहिल्याच कसोटी सामन्यात दोन्ही डावात मिळून ३०० धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये ११ खेळाडूंनी पहिल्याच कसोटी सामन्यात दोन्ही डावात मिळून २०० धावा केल्या आहेत.
या लेखात कसोटी पदार्पणात सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांची आपण माहिती घेणार आहोत.
५. कुमार श्री रणजीतसिंगजी (२१६ धावा)
त्यावेळी राजपुत्र म्हणून ओळखले गेलेले रणजीतसिंगजी यांनी इंग्लंडकडून क्रिकेट खेळले. भारतातील काठीवार येथे जन्म झालेल्या रणजीतसिंगजी यांनी केंब्रिज विदयापीठ, लंडन काऊंटी व ससेक्सकडून क्रिकेट खेळले. त्यांचे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील कारकिर्द अतिशय उत्तम होती.
१६ जुलै १८९६ रोजी त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध मॅंचेस्टर येथे कसोटी पदार्पण केले. पहिल्या डावात त्यांनी ६२ तर दुसऱ्या डावात त्यांनी १५४ धावा अशा एकूण २१६ धावा पहिल्याच सामन्यात केल्या. तरीही हा सामना इंग्लंडला ३ विकेट्सने गमवावा लागला होता. १५ कसोटी सामने खेळलेल्या रणजीतसिंगजींना कारकिर्दीत केवळ २ शतके करता आली.
४. जॅक रुडाॅल्फ (२२२ धावा)
दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज जॅक रुडाॅल्फने २४ एप्रिल २००३ रोजी चितगाव, बांगलादेश येथे बांगलादेशविरुद्ध कसोटी पदार्पण केले. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत त्याने पहिल्या डावात नाबाद २२२ धावांची शानदार खेळी केली व बोयटा डिप्पेनारबरोबर ४२९ धावांची भागीदारीही केली. दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेला फलंदाजी मिळाली नाही. कारण तत्पुर्वीच बांगलादेश टीम हा सामना डावाने पराभूत झाली होती. त्यामुळे रुडाॅल्फच्या नावावर पहिल्या सामन्यात २२२ धावा जमा झाल्या. २२२ हीच त्याची कसोटीतील कायमची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या राहिली.
३. यासीर हमीद (२७५ धावा)
पाकिस्तानचा माजी फलंदाज यासीर हमीदने २० ऑगस्ट २००३ रोजी कराची येथे बांगलादेशविरुद्ध कसोटी पदार्पण केले. यात त्याने पहिल्याच कसोटी सामन्यात दोन्ही डावात शतकी खेळी केली. अशी कामगिरी करणारा तो जगातील दुसरा फलंदाज ठरला होता. आजही तो विक्रम त्याच्या नावावर आहे. त्याने पहिल्या डावात १७० व दुसऱ्या डावात १०५ धावांची खेळी केली होती. यामुळे त्याच्या पदार्पणाच्या सामन्यात त्याने २७५ धावा केल्या होत्या. पुढे २५ कसोटी सामने खेळलेल्या यासीर हमीदला कधीही कसोटीत शतकी खेळी करता आली नाही.
२. टीप फाॅस्टर (३०६ धावा)
इंग्लंडचे माजी कसोटीपटू टीप फाॅस्टर यांनी सिडनी कसोटीत ११ डिसेंबर १९०३ रोजी पदार्पण केले. यात त्यांनी पहिल्या डावात २८७ तर दुसऱ्या डावात १९ धावा केल्या. यामुळे या कसोटी सामन्यात त्यांनी एकूण ३०६ धावा केल्या. पुढे त्यांना एकूण ८ कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली परंतु कधीही शतकी खेळी करता आली नाही.
१. लाॅरेन्स रोव (३१४ धावा)
वेस्ट इंडिजचे माजी फलंदाज लाॅरेन्स रोव यांनी न्यूझीलंडविरुद्ध किंग्जस्टन जमैका येथे १६ फेब्रुवारी १९७२ रोजी कसोटी पदार्पण केले. यात त्यांनी पहिल्या डावात २१४ तर दुसऱ्या डावात नाबाद १०० धावांची खेळी केली. यामुळे त्यांची पहिल्या सामन्यातील धावांची बेरीज ही ३१४ झाली. याबरोबर त्यांनी १९०३ साली टीप फाॅस्टर यांनी पहिल्याच सामन्यात केलेला ३०६ धावांचा विक्रम मोडीत काढला. कसोटीत पदार्पणात दोन्ही डावात शतकी खेळी करणारे ते जगातील तेव्हाचे पहिले फलंदाज होते. आजही पहिल्या कसोटी सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. त्यांच्या कारकिर्दीत डोळ्याच्या आजाराने व गवताच्या एलर्जीने अनेक अडचणी आल्या. यामुळे त्यांना केवळ ३० कसोटी सामने खेळता आले. त्यात त्यांनी एकूण ७ शतके केली.
गोष्ट एका क्रिकेटरची लेखमालेतील वाचनीय लेख-
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १९: पाकिस्तानला नेहमीच घाम फोडणारा वेंकटेश प्रसाद
–गोष्ट एका क्रिकेटची भाग १८: एकेकाळचा बाॅम्बे डक ते भारताचा प्रमुख गोलंदाज अजित अगरकर
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १७: धोनी आधी पदार्पण करुनही १४ वर्षांचा वनवास पाहिलेला दिनेश कार्तिक
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १६: राजेशाही घराण्यातूनच क्रिकेटचा वारसा घेऊन आलेला अजय जडेजा
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १५: शंभर कसोटी सामन्यांच्या उंबरठ्यावर असणारा इशांत शर्मा
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १४: भारताचा जंबो गोलंदाज अनिल कुंबळे
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १३: तब्बल १८ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा आशिष नेहरा
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १२: कारखान्यात काम करायला झाम्बियाला निघालेला मुनाफ पटेल
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ११: लांब केसांमुळे संघात प्रवेश नाकारलेला मुरली विजय
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १०: भारताचा भन्नाट क्षेत्ररक्षक मोहम्मद कैफ
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ९: म्हैसुर एक्सप्रेस जवागल श्रीनाथ
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ८: मिस्टर आयपीएल सुरेश रैना
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ७: अहमदनगरचा मराठमोळा झहीर खान
– गोष्ट एका क्रिकेटरची भाग ६: व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ५: मोठ्या भावाच्या जागी स्थान मिळालेला तो पुढे सर्वांचा दादा झाला
–एका क्रिकेटटरची गोष्ट भाग ४: ट्रक ड्राईव्हर बनण्यासाठी कॅनडाला निघालेला हरभजन सिंग
-गोष्ट एका क्रिकेटरची भाग ३: त्रिशतकाची भविष्यवाणी पदार्पणाआधीच करणारा विरेंद्र सेहवाग!
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग २: ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान संघाशी वैर घेणारा इरफान पठाण