सध्या भारतात सुरू असलेल्या वनडे विश्वचषकाची सर्वत्र चर्चा आहे. भारतीय संघ वनडे विश्वचषक जिंकण्यासाटी प्रवळ दावेदार असून अंतिम सामन्यात स्थान पक्के केले आहे. पण अशातच भारतीय क्रिकेटचा सर्वात यशस्वी कर्णधार, अशी ओळख असणाऱ्या एमएस धोनी याच्याबाबत खास बातमी समोर येत आहे. तब्बल 20 वर्षांनंतर धोनीने आपल्या गुळ गावी भेट दिली.
एमएस धोनी (MS Dhoni) भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे. त्याच्या नेतृत्वात भारताने टी-20 विश्वचषक, वनडे विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी या तिन्ही आयसीसी ट्रॉफी जिंकल्या आहेत. या तिन्ही आयसीसी ट्रॉफी जिंकणारा धोनी जगातील एकमेव कर्णधार आहे. भारतीय संघासोबत मोठी क्रिकेट कारकीर्द बनवणाऱ्या धोनीला दरम्यानच्या काळात आपल्या मुळ गावी जाण्यासाठी वेळ मिळाला नाही. अशात बुधवारी (15 नोव्हेंबर) तब्बल 20 वर्षांनंतर त्याने आपल्या गावाला भेट दिली.
उत्तराखंडमधील जैती तालुक्यात वसलेले ल्वाली हे धोनीचे मुळ गाव आहे. बुधवारी सकाळी अंदाजे 11 वाजता धोनी आणि त्याची पत्नी साक्षी ल्वालीमध्ये पोहोचले. त्याठिकाणी या दोघांनी गावकऱ्यांसोबत अनेक फोटो काढले. माध्यमांतील वृत्तांनुसार धोनीने गावकऱ्यांची विचारपूस केली. तसेच गावातील मदिरांमध्ये त्याने पूजा देखील केली. गावातील क्रिकेटपटूंना धोनीकडून मोलाचे मार्गदर्शन मिळाले. तसेच या खेळाडूंकडून गावात क्रिकेट अकादमी आणि मैदानासाठी प्रस्ताव ठेवला गेला. धोनीने देखील त्याच्या परीने प्रयत्न करण्याचा शब्द दिल्याचे सांगितले जात आहे.
MS Dhoni with fans in a village.
– MS, what a man…!!!pic.twitter.com/WzTMwWioKA
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 16, 2023
आपल्या मुळ गावी धोनी पत्नी साक्षीला घेऊन गेला. मात्र, मुलगी झीवा यावेळी त्यांच्यासोबत नव्हती. माध्यमांतील वृत्तांनुसार धोनीने गावकऱ्यांना पुढच्या वेळी येताना झीवाला सोबत घेऊन येण्याचा शब्द देखील दिला आहे. धोनीची ही भेट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
धोनीच्या कारकिर्दीवर एक नजर टाकली, तर त्याने भारतासाठी 90 कसोटी, 350 वनडे आणि 98 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यात धोनीने अनुक्रमे 4876, 10773 आणि 1617 धावा केल्या. इंडियन प्रीमियर लीगमधून धोनीने अद्याप निवृत्ती घेतली नाहीये. त्याच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्ज संघाने आतापर्यंत 5 आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत. (MS Dhoni visited his native village after almost 20 years)
महत्वाच्या बातम्या –
Semi Final Pitch Controversy: खेळपट्टीच्या वादात विलियम्सनची एन्ट्री; पराभवानंतर म्हणाला, ‘खेळपट्टी खूपच…’
Semi Final जिंंकल्यानंतर इमोशनल झाले भारतीय खेळाडू, अश्विनने हाताचे चुंबन घेताच शमी म्हणाला, ‘उत्तर देऊन…’