क्रिकेटमधून मोठी बातमी समोर येत आहे. नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी म्हणजेच नाडाने सन 2023च्या पहिल्या 5 महिन्यात केलेल्या डोपिंग चाचणी याबाबत माहिती जारी केली आहे. नमुने घेण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये रवींद्र जडेजा हा सर्वाधिकवेळा डोपिंगची चाचणी केली आहे. जडेजा सर्वाधिक 3 वेळा डोपिंग चाचणीसाठी उपस्थित होता. सन 2023च्या जानेवारी ते मेपर्यंत जडेजाने 3 वेळा नमुने दिले आहेत.
सन 2023च्या सुरुवातीच्या 5 महिन्यात एकूण 55 क्रिकेट खेळाडूंची डोपिंग चाचणी (Doping Test) करण्यात आली. यामध्ये पुरुष आणि महिला खेळाडू मिळून एकूण 58 नमुने एकत्र करण्यात आले. यावर्षी आतापर्यंत घेण्यात आलेल्या डोपिंग चाचणीच्या नमुन्यांमध्ये भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्या एकाही नमुन्याचा समावेश नाहीये. मात्र, 2021 आणि 2022मध्ये रोहितने 3-3 वेळा नमुने दिले होते.
भारतीय टी20 संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या (Indian T20 Team Captain Hardik Pandya) हादेखील एप्रिल महिन्यात एकदा डोपिंग चाचणी करण्यासाठी उपस्थित राहिला आहे. याव्यतिरिक्त महिला खेळाडूंमध्ये भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) आणि उपकर्णधार स्मृती मंधाना (Smriti Mandhana) यांचा जानेवारी महिन्यात मुंबईतील एका सामन्यानंतर नमुना घेतला गेला.
यशस्वी आणि ईशानची डोपिंग चाचणी
भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याची सन 2021 आणि 2022मध्ये एकदाही डोपिंग चाचणी झाली नाही. यावर्षी आतापर्यंत एकूण 58मध्ये 7 रक्ताचे नमुनेही होते. जडेजा आणि हार्दिकव्यतिरिक्त ज्या भारतीय खेळाडूंचे नमुने घेण्यात आले, त्यात टी नटराजन, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, यशस्वी जयसवाल, केएल राहुल, मोहम्मद सिराज, मयंक अगरवाल, दीपक चाहर, राहुल त्रिपाठी, भुवनेश्वर कुमार, वृद्धिमान साहा, दिनेश कार्तिक, पीयुष चावला, मनीष पांडे आणि अंबाती रायुडू यांच्या नावाचाही समावेश आहे.
याव्यतिरिक्त आयपीएल हंगामादरम्यान काही परदेशी खेळाडूंचीही डोपिंग चाचणी करण्यात आली. त्यात आंद्रे रसेल, डेविड विली, ट्रेंट बोल्ट, मार्कस स्टॉयनिस, मार्क वूड, ऍडम झम्पा, लियाम लिव्हिंगस्टोन, जोफ्रा आर्चर, सॅम करन, डेविड वॉर्नर, सुनील नारायण, कॅमरून ग्रीन, डेविड वीस आणि राशिद खान यांच्या नावाचाही समावेश आहे. (nada collected 58 samples in first 5 months of 55 cricketers all rounder ravindra jadeja most times give samples)
महत्त्वाच्या बातम्या-
पृथ्वी शॉने द्विशतक ठोकताच ट्विटरवर प्रतिक्रियांचा महापूर; नेटकरी म्हणाले, ‘भविष्यातील सेहवाग, आता गिलला…’
“आमच्या वेळी म्हणायचे…” भारत-पाकिस्तान सामन्याबाबत दिग्गजाचे मोठे विधान