धुळे चोला वीरांस विरुद्ध नंदुरबार हिमालयन ताहर्स यांच्यात आजची तिसरी लढत झाली. धुळे संघाने रेलीगेशन फेरीतील पहिला सामना जिंकला होता.तर नंदुरबार संघाला पहिल्या सामन्यात रत्नागिरी कडून पराभव स्वीकारावा लागला होता. दोन्ही संघांनी सावध सुरुवात केली.
मध्यांतराला नंदुरबार संघाकडे 20-14 अशी आघाडी होती. नंदुरबार कडून तेजस काळभोर ने जबरदस्त खेळ करत पहिल्या हाफ मध्येबसुपर टेन पूर्ण केला. तर धुळे कडून मितेश कदम सुद्धा सुपर टेन पूर्ण केला
दुसऱ्या हाफ मध्ये सामना अंत्यत चुरशी झाला. शेवटची दहा मिनिटं शिल्लक 28-25 आघाडी नंदुरबार संघाकडे होती. मात्र मितेश कदमच्या जबरदस्त खेळाच्या जोरावर शेवटच्या क्षणी धुळे संघाने सामना फिरवत आघाडी मिळवली. शेवटचा मिनिटं शिल्लक असताना 38-36 अशी आघाडी धुळे संघाकडे असताना धुळेच्या मितेश कदम ची सूपर टॅकल झाली आणि पुढच्या चढाईत तेजस काळभोर ने गुण मिळवत नंदुरबार संघाला 39-38 असा विजय मिळवून दिला. नंदुरबार संघाकडून तेजस काळभोर ने सर्वाधिक 18 गुण मिळवले. तर पकडीत अतुल राठोड ने 3 तर जयंत काळे ने 2 पकडी केल्या.धुळे संघाकडून मितेश कदम ने 26 गुण मिळवत एकट्याने प्रतिकार केला. (Nandurbar Himalayan Tahrs won the match)
बेस्ट रेडर- मितेश कदम, धुळे चोला वीरांस
बेस्ट डिफेंडर्स- अतुल राठोड, नंदुरबार हिमालयन ताहर्स
कबड्डी का कमाल- तेजस काळभोर, नंदुरबार हिमालयन ताहर्स
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सेंट्रल कॉन्ट्रॅक सोडल्याचा फायदाच! जाणून घ्या ट्रेंट बोल्ट का बनला फ्रिलांस क्रिकेटर?
सनरायझर्सविरूद्ध केकेआरची नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी! अशी आहे प्लेईंग इलेव्हन