---Advertisement---

“कधी वाटले नव्हते १०० कसोटी खेळेल”; ऐतिहासिक सामन्याच्या पूर्वसंध्येला विराट झाला व्यक्त

On: गुरूवार, मार्च 3, 2022 4:59 PM
virat kohli
---Advertisement---

मोहाली। शुक्रवारपासून (४ मार्च) भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) संघात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू होत आहे. या मालिकेतील पहिला सामना भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याच्यासाठी ऐतिहासिक ठरणार आहे. हा त्याचा त्याच्या कसोटी कारकिर्दीतील १०० वा सामना असणार आहे. या सामन्याच्या आधी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आपल्या या अधिकृत ट्विटरवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्याने आपल्या शंभराव्या कसोटी सामन्याविषयी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाला विराट?

बीसीसीआयने एक व्हिडिओ शेअर केला. ज्यामध्ये तो आपला शंभरावा कसोटी सामना व एकूण कारकिर्दीविषयी बोलताना दिसत आहे. विराट म्हणाला,

“प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास मी कधीही विचार केला नव्हता की, मी देशासाठी १०० कसोटी सामने खेळेल. हा खूप दीर्घ प्रवास होता. मी स्वतःला भाग्यशाली समजतो की, मी १०० सामने खेळू शकलो.”

https://twitter.com/BCCI/status/1499300756205101058?t=PfWMlYDeoSTSMEDiaxWjpw&s=19

“मी या प्रवासात खूप आंतरराष्ट्रीय सामने खेळलो. खूप कष्टही केले. माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी हा मोठा क्षण आहे. या सर्वामुळे सर्वाधिक आनंदी माझे प्रशिक्षक आहेत. त्यांच्यामुळेच मी इथपर्यंत पोहोचू शकलो.‌ लहानपणी मी छोट्या खेळ्या करायचो. ७ वी ८ वी मध्ये गेल्यानंतर मी अधिक गांभीर्याने खेळू लागलो. कनिष्ठ स्तरावर मी अनेक द्विशतके केली. नेहमी खेळाचा आनंद घेतला व संघाला विजयी करण्यात योगदान देण्याचा प्रयत्न करत राहिलो. हा एक वेगळा अनुभव होता.” असे विराट पुढे बोलताना म्हणाला.

मोहलीत खेळणार ऐतिहासिक सामना

श्रीलंकेविरुद्ध मोहाली येथे विराट आपल्या शंभराव्या कसोटी सामन्यात उतरेल. शंभर कसोटी सामने खेळणारा तो भारताचा १२ वा कसोटीपटू ठरेल. तसेच या सामन्यात मागील दोन वर्षांपासून प्रलंबित असलेले त्याचे ७१ वे आंतरराष्ट्रीय शतक पूर्ण करण्याची त्याच्याकडे संधी असेल.

महत्वाच्या बातम्या-

IPL 2022: ‘या’ तारखेपासून संघ सुरू करू शकतात सराव, महाराष्ट्र सरकारची ५ जागांसाठी मंजूरी (mahasports.in)

‘विराट महान खेळाडू आहे आणि तो…’, बीसीसीआय अध्यक्ष गांगुलीकडून कोहलीच्या पाठीवर कौतुकाची थाप (mahasports.in)

‘पुष्पा’नंतर आता ‘बच्चन पांडे’चे दिवाने झाले क्रिकेटर्स; चक्क ‘खिलाडी’लाही देतायेत टक्कर, व्हिडिओ व्हायरल (mahasports.in)

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---