भारताचा माजी स्टार क्रिकेटर इरफान पठाण अनेकदा त्याची पत्नी सफा बेगसोबत अनेक छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर करत असतो, परंतु त्याची पत्नी सफा बेग बहुतेक हिजाबमध्ये दिसते आणि तिचा चेहराही दाखवत नाही.
सफा बेगचा जन्म 28 फेब्रुवारी 1994 रोजी झाला. सफा बेग सौदी अरेबियातील जेद्दाह जिल्ह्यातील अझीझिया येथे वाढली. सफा बेगने सौदी अरेबियाच्या इंटरनॅशनल इंडियन स्कूलमधून शिक्षण घेतले आहे. साफा आणि इरफानच्या भेटीबाबत कोणतीही माहिती नाही, पण असे म्हटले जाते की, दोघांची पहिली भेट 2014 मध्ये दुबईमध्ये झाली होती. त्यानंतर 2016 मध्ये दोघांनी लग्न केले.
इरफान व सफा यांची पहिली भेट 2014 मध्ये झाली होती. इरफान पहिल्या नजरेत सफाच्या प्रेमात पडला. दोघांमध्ये सुमारे 10 वर्षांचे अंतर आहे, परंतु असे असतानाही दोघांनी एकमेकांचा हात धरला. इरफान पठाण आणि सफा बेग दोन वर्षे एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर इरफानने वडोदरात सफाची त्याच्या आई-वडिलांशी ओळख करुन दिली, त्यानंतर दोघांनी लग्न केले. 4 फेब्रुवारी 2016 रोजी इरफान पठाण आणि सफा बेगचे लग्न झाले. त्याच वेळी, 20 डिसेंबर 2016 रोजी दोघेही एका मुलाचे पालक झाले.
सफा बेग ही मॉडेल आहे
सफा बेग मध्य पूर्व आशियातील एक मोठी मॉडेल देखील आहे आणि तिथल्या अनेक मोठ्या फॅशन मासिकांमध्ये तिची छायाचित्रे प्रकाशित झाली आहेत. सफा बेगचा जन्म 28 फेब्रुवारी 1994 रोजी झाला असून ती इरफान पठाणपेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. इतकेच नाही तर सफाला उत्कृष्ट नेल आर्टिस्ट म्हणूनही ओळखले जाते. तिचे फ्लिकर पेज नावाचे पेजही आहे.
साफा तिचा चेहरा का दाखवत नाही?
काही वर्षांपूर्वी जेव्हा सोशल मीडियावर साफा बेगचा चेहरा लपवल्याबद्दल यूजर्स इरफानवर टीका करत होते, तेव्हा त्याच्या पत्नीने या प्रकरणावर आपले मौन तोडले होते. हिजाबमध्ये राहून चेहरा न दाखवण्याची तिची इच्छा असून एका चांगला पती या नात्याने इरफान पठाण सफाला सपोर्ट करतो, असे सफाने सांगितले होते. 2023 साली भारतात खेळल्या गेलेल्या विश्वचषकादरम्यान एका पार्टीत इरफान पठाणची पत्नी सफा बेगचा चेहरा पहायला मिळाला होता.
महत्तवाच्या बातम्या-
धक्कादायक! माझी सर्व कमाई दान करणार; टी20 विश्वचषकादरम्यान रिषभ पंतने दिले वचन
मोठी बातमी! न्यूझीलंडच्या दिग्गज खेळाडूचा हा शेवटचा टी20 विश्वचषक असेल, स्वत: केली घोषणा
भारत विरुद्ध कॅनडा सामन्यात कर्णधार रोहित शर्माला इतिहास रचण्याची सुवर्णसंधी!