आगामी आयपीएल 2025 मध्ये अनेक संघांचे कर्णधार बदललेले दिसतील. यामध्ये लखनऊ सुपर जायंट्सच्या संघाचं नाव देखील समाविष्ट आहे. लखनऊच्या फ्रँचायझीनं मेगा लिलावापूर्वी निकोलस पूरनला रिटेन केलं होतं. त्यानंतर असं वाटत होतं की कदाचित तो कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळेल. मात्र लिलावादरम्यान लखनऊनं रिषभ पंतला 27 कोटी रुपयांच्या विक्रमी किमतीत संघात शामील केलं. त्यामुळे आता कर्णधारपदाची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न सर्वांच्या मनात आहे. पंतनं कर्णधारपद न मिळाल्यानंच दिल्ली कॅपिटल्सची साथ सोडल्याच्या बातम्या आल्या आहेत.
जर आपण लखनऊ सुपर जायंट्सच्या कर्णधारपदाबद्दल बोललो तर, केएल राहुल गेल्या तीन हंगामापासून ही जबाबदारी सांभाळत होता. परंतु गेल्या मोसमात संघाचे मालक संजीव गोयंका आणि राहुल यांच्यात मैदानावर खटकलं होतं, ज्यानंतर राहुलला रिटेन केलं जाणार नसल्याच्या बातम्या आल्या होत्या. लिलावापूर्वी असंच घडलं आणि राहुलला रिलिज करण्यात आलं.
प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर संजीव गोयंका यांना विचारलं की, पंत संघाचा कर्णधार बनेल की आम्हीला काही सरप्राईज पाहायला मिळेल? यावर गोयंका म्हणाले, “माझ्या मते मी सरप्राईज देत नाही. आमचा निर्णय झाला आहे. आम्ही येत्या काही दिवसांत तो जाहीर करू.”
संजीव गोयंका यांना विचारण्यात आलं की त्यांनी रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये का खर्च केले. यावर ते म्हणाले, “दिल्ली कॅपिटल्सनं श्रेयस अय्यरसाठी 26.50 कोटी रुपयांपर्यंत बोली लावली होती. याचा अर्थ त्यांच्या नंबर 1 खेळाडूसाठी त्यांच्याकडे एवढं बजेट होतं. तसेच पार्थ (जिंदाल) यांचे रिषभबद्दलचं प्रेम पाहता ते त्याच्यावर श्रेयसपेक्षा आणखी अधिक खर्च करू शकतात, असं आम्हाला वाटलं. त्यामुळे आम्ही त्याच्यावर मोठी बोली लावली.”
आयपीएल 2024 नंतर दिल्ली कॅपिटल्सच्या मॅनेजमेंटच्या रिषभ पंतसोबत मतभेदाच्या बातम्या आल्या होत्या. लिलावात 20 कोटींपेक्षा जास्त बोली असूनही दिल्लीनं त्याच्यासाठी राईट टू मॅच (आरटीएम) कार्ड वापरायची तयारी केली होती. मात्र नंतर लखनऊनं जी रक्कम सांगितली, दिल्ली तिला मॅच करू शकली नाही. अशाप्रकारे रिषभ पंत लखनऊ सुपर जायंट्सच्या संघात शामील झाला.
हेही वाचा –
विराट कोहली ‘वर्ल्ड रेकॉर्ड’ पासून केवळ एवढ्या धावा दूर, ब्रायन लाराचा मोठा विक्रम मोडणार!
ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांचा विराट कोहलीबाबत मोठा खुलासा; म्हणाले, “त्याची फॅन फॉलोइंग…”
जसप्रीत बुमराह इतिहास रचण्यापासून फक्त एक पाऊल दूर, अशी कामगिरी करणारा बनेल जगातील पहिला गोलंदाज!