भारतीय क्रिकेट संघाला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तीन सामन्याच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना जिंकण्यात यश मिळाले. त्यामुळे या मालिकेला विजयाने सुरुवात झाली. त्यानंतरही भारतीय संघाचा माजी सलामी फलंदाज वीरेंद्र सेहवाग पहिल्या टी-20 सामन्यासाठी निवडण्यात आलेल्या प्लेईंग इलेव्हनबद्दल नाराज दिसून आला. त्याने पहिल्या सामन्यात निवडण्यात आलेल्या प्लेईंग इलेव्हनबाबत प्रश्न उपस्थित केले आहे आणि विराटवर संताप व्यक्त केला.
पहिल्या सामन्यात प्लेईंग इलेव्हनमध्ये श्रेयस अय्यरला स्थान दिले नव्हते आणि त्याच्या जागी मनीष पांडेला संधी दिली होती.
सेहवाग श्रेयस अय्यरला संघातून बाहेर ठेवल्याबद्दल बोलताना म्हणाला, मागील काही टी-20 सामन्यांच्या मालिकेत त्याने चांगली कामगिरी केली आहे. सेहवाग एका क्रीडा वाहिनीवर बोलताना म्हणाला, “जर तुम्ही श्रेयस अय्यरला बघाल, तर मागील टी-20 मालिकेत त्याने खूप प्रभावित केले आहे. जेव्हा कोणी चांगले खेळत आहे, तेव्हा त्याला तुम्ही कशाच्या आधारावर प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर ठेवता.”
सर्व खेळाडूंना लागू होणारे नियम, विराटला लागू होत नाहीत
सेहवागने प्रश्न उपस्थित करत म्हटले की, “अय्यरला संघात न घेण्याचे कारण काय होते? मला नाही वाटत श्रेयस अय्यरजवळ येवढी हिम्मत असेल की तो विचारू शकेल की मला संघात का स्थान दिले नाही. येथे मी अजून एक गोष्ट सांगतो की विराटला सोडून सर्व नियम सर्व खेळाडूंसाठी लागू होतात, परंतु त्याच्यावर कोणताच नियम लागू होत नाही. ना त्याच्या फलंदाजीच्या क्रमांकामध्ये कोणता बदल होतो आणि जर त्याचा फॉर्म खराब असला, तरीही त्याला ब्रेक दिला जात नाही आणि हे खूप चुकीचे आहे.”
प्लेईंग इलेव्हनमध्ये युझवेंद्र चहललासुद्धा नव्हते दिले स्थान
पहिल्या सामन्यात प्लेईंग इलेव्हनमध्ये युझवेंद्र चहललासुद्धा सहभागी केले नव्हते. मात्र, जडेजाला झालेल्या दुखापतीमुळे
कन्कशन सब्स्टिट्यूटच्या माध्यमातून खेळण्याची संधी मिळाली. त्याने कमालीचे प्रदर्शन करताना तीन विकेट्स घेतल्या. ज्यामध्ये स्टीव्ह स्मिथ आणि ऍरॉन फिंच यांच्या महत्त्वपूर्ण विकेट्स घेत विजयात मोलाची भूमिका बजावली.
महत्त्वाच्या बातम्या-
एकाही आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व न करणारा युवा खेळाडू आहे वॉर्नरचा फेव्हरेट
“झहीरने गांगुलीच्या नेतृत्वात जशी कामगिरी केली, तशीच टी नटराजन विराटच्या नेतृत्वात करू शकतो”
मोठी बातमी! कोरे अँडरसनची न्यूझीलंड क्रिकेटमधून निवृत्ती; आता ‘या’ देशात खेळणार क्रिकेट
ट्रेंडिंग लेख-
अखेर तीन दिवसांच्या प्रतिक्षेनंतर एमएस धोनीचे झाले होते कसोटी पदार्पण
HBD गब्बर : चाहत्यांच्या नजरेत भरलेल्या शिखर धवनच्या ३ सर्वोत्कृष्ट खेळी