टेनिस खेळात विश्वातील प्रथम क्रमांकाचा खेळाडू नोवाक जोकोविच याने ९ व्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनची अंतिम फेरी गाठली आहे. त्याने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन ओपनच्या सेमी फायनलमध्ये प्रवेश केलेल्या रूसच्या असलान कारात्सेव याला पराभूत केले आहे. तर दुसरीकडे २४ व्या ग्रँड स्लॅम विजेतेपदाच्या प्रतीक्षेत असलेल्या सेरेना विल्यम्स हिच्या प्रतिक्षेत आणखीन वाढ झाली आहे. सेरेना विल्यम्स हिला सेमी फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.
जोकोविचने कारेत्सेवला सेमी फायनलमध्ये केले पराभूत
ऑस्ट्रेलियन ओपनच्या इतिहासात ९ व्यांदा अंतिम फेरी गाठणाऱ्या नोवाक जोकोविच आतापर्यंत खेळलेल्या ऑस्ट्रेलियन ओपनमधील उपांत्य फेरीत एकदाही पराभूत झाला नाहीये. त्याने उपांत्य फेरीत कारेत्सेवचा ६-३, ६-४, ६-२ ने पराभव केला. आता डेनिल मेदवेदेव आणइ स्टेफनोस सितसिपास यांच्यात होणाऱ्या दुसऱ्या उपांत्य फेरी सामन्यात जो कोणी विजेता होईल, त्याचा सामना रविवारी अंतिम फेरीत नोवाक जोकोविच याच्यासोबत होणार आहे. यातून ऑस्ट्रेलियन ओपनचा विजेता टेनिसपटू मिळेल.
खास बाब अशी की, वयाची तिशी ओलांडल्यानंतरही ३ वेळा ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम सामन्यात प्रवेश मिलमारा नोवाक जोकोविच पहिलाच खेळाडू ठरला आहे.
This is Novak's #AusOpen world and we're just living in it 🌏
🇷🇸 @DjokerNole is a finalist Down Under for the 9️⃣th time.#AO2021 pic.twitter.com/5tcIiCloHu
— #AusOpen (@AustralianOpen) February 18, 2021
28 Grand Slam finals for Djokovic.
The first man in the Open Era to reach three #AusOpen finals after turning 30. pic.twitter.com/3cewQfMi1h
— ATP Tour (@atptour) February 18, 2021
सेरेनाच्या प्रतीक्षेत वाढ
सेरेना विल्यम्स मागील ४ वर्षांपासून मारग्रेट कोर्टच्या २४ ग्रँड स्लॅम विजेतेपदाच्या बरोबरी करण्याचा प्रतीक्षेत आहे. परंतु तिला आणखी वाट पहावी लागणार आहे. २०१७ मध्ये तिने ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावले होते. त्यांनतर तिला विजेतेपद मिळविण्यात यश नाही आले. ३९ वर्षीय सेरेना विल्यम्सला, ओसाकाने महिला एकेरीच्या उपांत्य फेरीमध्ये ६-३, ६-४ ने पराभूत करत अंतिम फेरी गाठली. ओसाकाला २०१९ साली ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावण्यास यश आले होते.