भारत आणि इंग्लंड संघात ४ ऑगस्टपासून कसोटी सामन्यांची मालिका सुरू झाली आहे. या मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारताचा पहिला डाव २७८ धावांवर संपला. या सामन्यात भारताकडून केएल राहुल आणि रविंद्र जडेजाने अर्धशतकी खेळी केली. त्यांच्याव्यतिरिक्त अन्य कोणत्या फलंदाजांला मोठी खेळी करण्यात यश आले नाही.
जडेजाने शानदार अर्धशतक
भारताची मधली फळी अपयशी ठरल्यानंतर ७ व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या जडेजाने सलामीवीर केएल राहुलला चांगली साथ दिली. या दोघांनी भारताचा डाव पुढे नेताना ५० धावांची भागीदारी केली. पण राहुल ८४ धावांवर जेम्स अँडरसनविरुद्ध बाद झाला. त्याच्यानंतर जडेजाने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, ७५ व्या षटकात त्यानेही विकेट गमावली.
विशेष म्हणजे याच षटकात जडेजाने अर्धशतक पूर्ण केले होते. मात्र ऑली रॉबिन्सनने टाकलेल्या या षटकातील अखेरच्या चेंडूवर जडेजाने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा फटका चूकला आणि चेंडू हवेत उडून मिड-ऑफला गेला, तिथे स्टुअर्ट ब्रॉडने मागे जात तो चेंडू झेलला. त्यामुळे जडेजाने ८६ चेंडूत ८ चौकार आणि १ षटकारासह ५६ धावा करुन माघारी परतावे लागले.
Robbo with the big wicket of Jadeja!
Scorecard & Clips: https://t.co/nz2HQN3H2X#ENGvIND pic.twitter.com/rCFJJD8Bom
— England Cricket (@englandcricket) August 6, 2021
भारताकडे ९५ धावांची आघाडी
जडेजा बाद झाल्यानंतर अखेरीस शेवटच्या विकेटसाठी मोहम्मद शमी (७*) आणि जसप्रीत बुमराहने (२८) ३३ धावांची भागीदारी करत भारताला २७८ धावांपर्यंत पोहचवले. त्यामुळे भारताला ९५ धावांची आघाडी घेता आली.
तत्पूर्वी इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण भारतीय संघाने इंग्लंड संघाचा पहिला डाव फक्त १८३ धावांवर रोखला. या मध्ये इंग्लंड संघाचा फलंदाज जो रुटने सर्वाधिक ६४ धावा काढल्या होत्या. तर भारतीय संघाकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ४ गडी बाद केले.
महत्त्वाच्या बातम्या –
Video: पंतने सलग २ चेंडूत मारले चौकार-षटकार, पण त्यापुढच्याच चेंडूवर झाला ‘असा’ बाद