पाकिस्तानी संघाने नेदरलँड मध्ये झालेल्या वनडे नमालिकेत विजय मिळवला. मात्र, यावेळी नेदरलँड संघाने पाकिस्तानला बरोबरीची टक्कर दिली. तिन्ही सामन्यात त्यांनी विजय मिळवण्याचा प्रयत्न केला मात्र, शेवटी कोणतरी आडव यायचं. अशा परिस्थितीत तिसऱ्या वनडे सामन्यात पाकिस्तानी गोलंदाज नसीम शाहने नेदरलँडचे ५ गडी बाद करत उत्तम प्रदर्शन केले. यावेळी त्यानी घेतलेल्या एका विकेटचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये नसीमने बॉल एकदम अनपेक्षिकरित्या स्विंग करत विकेट कमावली आहे.
Naseem Shah the man you are! https://t.co/QGdBAwNskJ
— Ramiya 2.0 (@yehtuhogaaa) August 21, 2022
तिसऱ्या वनडे सामन्यात पाकिस्तानचे गोलंदाज नसीम शाह जबरदस्त लयीत दिसला. शहाने एकट्याने पाच विकेट्स घेतल्या. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात शाहने विरोधी संघाच्या पाच फलंदाजांना गोलंदाजी करत पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यात वरच्या फळीतील फलंदाज मुसा अहमद, कर्णधार स्कॉट एडवर्ड्स आणि खालच्या फळीतील फलंदाज तेजा निदामनुरू यांच्या विकेट्सचा समावेश होता.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
धोनीसोबत सराव अन् सचिनसोबत डिनर! ऋतुराज गायकवाडनं सांगितली आपली बकेट लिस्ट
FTX Crypto Cup: प्रज्ञानानंदाने तिसऱ्यांदा हरवलंय विश्वविजेत्या कार्लसनला, ठरला स्पर्धेत उपविजेता