पाकिस्तानचा माजी खेळाडू जावेद मियाँदाद याने भारताविरुद्ध पुन्हा एकद गरळ ओकली आहे. त्याने असे भाष्य केले आहे, जे वाचून किंवा ऐकून 140 कोटी भारतीयांच्या तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही. तो म्हणाला आहे की, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ जोपर्यंत आपला संघ त्यांच्या देशात पाठवत नाहीत, तोपर्यंत पाकिस्तानने यावर्षी होणाऱ्या वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेसह इतर सामन्यांसाठी भारतात गेले नाही पाहिजे.
काय म्हणाला मियाँदाद?
आयसीसीने तयार केलेल्या वनडे विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) ड्राफ्ट वेळापत्रकानुसार पाकिस्तानला 15 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर भारताचा सामना करायचा आहे. मात्र, 66 वर्षीय पाकिस्तानी कर्णधार जावेद मियाँदाद (Javed Miandad) याला वाटते की, आता भारताची पाळी आहे की, त्यांनी पाकिस्तानचा दौरा करावा. तो म्हणाला, “पाकिस्तान 2012 आणि 2016मध्येही भारतात गेला आणि आता भारतीयांची पाळी आहे की, त्यांनी इथं यावं.”
पुढे बोलताना तो म्हणाला की, “जर मला निर्णय करायचा असता, तर मी कधीच कोणता सामना खेळण्यासाठी भारतात गेलो नसतो. विश्वचषकातही नाही. आम्ही त्यांच्यासोबत खेळण्यासाठी तयार असतो, पण ते कधीच अशाप्रकारची प्रतिक्रिया देत नाहीत.” मियाँदाद म्हणाला की, “पाकिस्तानचे क्रिकेट मोठे आहे. आम्ही आताही चांगले खेळाडू तयार करत आहोत. त्यामुळे मला वाटत नाही की, जर आम्ही भारतात गेलो नाही, तर त्याने कोणता फरक पडेल.”
‘खेळ राजकारणात आणला नाही पाहिजे’
भारताने मागील वेळी 50 षटकांच्या आशिया चषकासाठी 2008मध्ये पाकिस्तानचा दौरा केला होता. त्यानंतर दोन्ही देशात राजकीय तणावामुळे द्विपक्षीय क्रिकेटचे नाते संपले आहे. मियाँदादनुसार, खेळ राजकारणात आणला नाही पाहिजे. तो म्हणाला, “मी नेहमीच म्हणत आलो आहे की, कोणीही आपला शेजारी निवडू शकत नाही, त्यामुळे एकमेकांशी सहकार्याने राहिलेलं चांगलं आहे. मी नेहमी सांगतो की, क्रिकेट असा खेळ आहे, जो लोकांना जवळ आणतो आणि देशांमधील गैरसमज आणि तक्रारी दूर करू शकतो.”
‘या’ निर्णयाने मियाँदाद नाखुश
पाकिस्तानला आगामी आशिया चषक 2023 चे यजमानपद वाटून घेण्याचा निर्णय मान्य करावा लागल्यानंतर मियाँदादने ही प्रतिक्रिया दिली. यामध्ये भारतीय संघ सर्व सामने श्रीलंकेत खेळणार असल्याचे निश्चित झाले. या निर्णयाने मियाँदाद नाखुश आहे. तो म्हणाला की, “असे म्हटले जात होते की, ते एकदा आशिया चषकासाठी आपला संघ पाकिस्तानात पाठवणार नाहीत. त्यामुळे आता वेळ आली आहे की, आम्हीदेखील कठोर भूमिका घेतली पाहिजे.”
अशात मियाँदादच्या या वक्तव्याने देशभरात खळबळ माजली असून चाहते प्रतिक्रियांचा पाऊस पाडत आहेत. दुसरीकडे, आशिया चषक 2023 स्पर्धेला 31 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. तसेच, हंगामाचा अंतिम सामना 17 सप्टेंबर रोजी होणार आहे. (pakistani former cricketer javed miandad doesnt want pakistan to tour india for world cup 2023)
महत्वाच्या बातम्या-
बिग ब्रेकिंग! आशिया चषक 2023मधील भारत-श्रीलंका सेमी फायनल मॅच रद्द, आता कधी होणार सामना?
इतिहास रचण्यासाठी झिम्बाब्वेच्या पठ्ठ्याने खेळले फक्त 70 चेंडू, नेपाळविरुद्ध नावावर केला खास विक्रम